Tips to Say Goodbye to Toxic Relationship: अँटी व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस हा ब्रेकअप डे असतो. २१ फेब्रुवारी रोजी ब्रेकअप डे साजरा केला जातो. कोणत्याही टॉक्सिक रिलेशनशिपचा अंत करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. एखादी व्यक्ती टॉक्सिकन नात्यात असताना नेहमी उदास राहते. अशा प्रकारचे नाते तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते. असं म्हणतात की प्रेमाच्या नात्यात प्रवेश करणं जितकं कठीण असतं तितकंच त्यातून बाहेर पडणंही अवघड असतं. पण जर नाते तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागले तर ते संपवणे कधीही चांगले असते. काही मार्ग आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही खराब नाते संपवू शकता. तुम्ही सुद्धा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असाल तर ब्रेकअप डेच्या दिवशी त्याला गुडबाय म्हणण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
कोणत्याही नात्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे समस्या समजून घेणे. अनहेल्दी रिलेशनशिपमधून बाहेर पडण्यासाठी तज्ञ किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याचा विचार करा. या काळात तुम्ही खरोखरच अनहेल्दी नात्यात आहात की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर असे खरंच असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या.
जर तुमचा जोडीदार तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्याशी खोटे बोलत असेल किंवा रिलेशनशिपमध्ये असताना तुम्हाला नेहमी नकारात्मक वाटत असेल तर तुम्ही हेल्दी रिलेशनशिपमध्ये नसल्याचे हे लक्षणं आहेत. अनेकदा लोक अशा नात्यातून बाहेर पडण्यासाठी निमित्त काढू लागतात. या प्रकारच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी स्पष्टपणे बोलणे किंवा सांगणे कधीही चांगले असते.
टॉक्सिक रिलेशनशिपमधून बाहेर पडण्याचा हा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे. रिलेशनशिपमध्ये असताना तुम्हाला कसे वाटते हे तुमच्या पार्टनरला उघडपणे सांगा. असे केल्याने तुम्ही स्वतःला इतरांना दोष देण्यापासून थांबवू शकता. तुमच्या नात्याबद्दल ज्या भावना आहेत त्या प्रामाणिकपणे मान्य करा आणि खरं बोला.
व्यक्तीने कधीही त्याच्या स्वाभिमानाशी तडजोड करू नये. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वाभिमानावर आणि सेल्फ लव्हवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला तुमच्या टॉक्सिक पार्टनरपासून वेगळे होण्याचे धैर्य मिळेल. आपला स्वाभिमान खूप महत्त्वाचा असतो.
जर तुम्ही नाते संपवण्याचा निर्णय घेतला असेल तर दोघांनीही त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. असे केल्याने तुम्ही शांतपणे एकमेकांपासून वेगळे होऊ शकाल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)