Healthy Breakfast Recipes: वीकेंडला प्रत्येकाला नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते. सगळ्यांना ऑफिस, कॉलेज आणि इतर कामे करून थकवा आलेलो असतो. अनेक महिला घरातील आणि ऑफिसमधील दोन्ही कामे सांभाळतात. अशा परिस्थितीत, रविवराचा एकच दिवस तुम्हाला विश्रांतीसाठी असतो. त्यामुळेच तुमचा फार वेळ नाश्त्यातच जायला नको, या विचाराने आम्ही एक झटपट पण चविष्ट बनणारी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी अगदी २० ते ३० मिनिटांनत तुम्ही बनवू शकता. शिवाय घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून. महत्वाचं म्हणजे हे चवीला उत्कृष्ट असण्यासोबतच हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही हे तुमच्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खाऊ घालू शकता.
आज आम्ही तुम्हाला चीला कसा बनवायचा ते शिकवणार आहोत. हा चीला बेसनाचा किंवा रव्याचा नसून पिठाचा आहे. पीठ तुम्हाला प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात पुरवते, तर भाज्या तुमच्या जेवणात आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे जोडतात. अशा परिस्थितीत तुम्ही पटकन पिठाचा चीला बनवून सकाळी खाऊ शकता.
-पीठ
-मीठ
-दही
-ओरेगॅनो
-आले
-सिमला मिरची
-गाजर
-बीन्स
-कांदा
-हिरवी मिरची
-ताजी चिरलेली कोथिंबीर
-एक चिमूटभर हळद
आटा चिला अर्थातच पिठाचा चीला बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी मैदा घ्या. या पीठात मीठ, हळद आणि दही घालून मिक्स करा. यानंतर पाणी घालून ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असे मध्यम पीठ बॅटर तयार करा. आता पीठ तयार झाल्यावर त्यात ओवा, आले, हिरवी मिरची आणि सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करा. यानंतर गॅसवर एक पॅन ठेऊन गरम करा.
पॅन गरम झाल्यानंतर त्यावर थोडं तेल लावा म्हणजे तवा गुळगुळीत एकसारखा होईल. यानंतर मोठ्या चमच्याच्या साहाय्याने पीठ तव्यावर ओतून आंबोली, उत्तपमसारखा चीला बनवा. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. शिजल्यावर हिरवी चटणी आणि केचप बरोबर सर्व्ह करा. मुलांसोबत मोठ्यांनाही हा पदार्थ प्रचंड आवडेल.