Hotel-like upma recipe: भारतीय घरांमध्ये दररोजच्या नाश्त्याला उपमा अर्थातच रव्याचे उपीट आवर्जून बघायला मिळते. अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत होणारा हा पदार्थ असल्याने, महिला या पदार्थाला प्राधान्य देतात. तूप किंवा तेल घालून मऊसूत होणारा हा पदार्थ तोंडात लगेच विरघळून जातो. त्यामुळेच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच खाता येईल असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. उपीटची रेसिपी अगदी सोपी आहे. परंतु फक्त पाण्याचा अंदाज योग्यरीत्या समजायला हवा. नाहीतर उपीट अगदीच पातळ किंवा गिचका होण्याची शक्यता असते. बहुतांश महिलांना उपीट बनवताना हीच अडचण होते की, त्यांचा उपीट गिचका होतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला हॉटेलसारखा मोकळा मऊसूत उपीट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
-२.५ वाटी पाणी
-१/३ कप बारीक चिरलेला कांदा
-१ टीस्पून चिरलेली हिरवी मिरची
-१ टीस्पून आले बारीक चिरून
-२ चमचे कोथिंबीर
-८ ते १०कढीपत्ता
-१ टीस्पून जिरा
-१ टीस्पून मोहरी
-मीठ चवीनुसार
-२-३ मिरची बारीक चिरून
-१० ते १२काजू
-१ टीस्पून चना डाळ
-१ टीस्पून उडीद डाळ किंवा मूग डाळ
-सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेऊन त्यात वरीलप्रमाणे घेतलेला रवा घाला.
- आता त्यात थोडेसे तेल किंवा तूप घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
-रवा भाजताना तो कढईच्या तळाला लागणार नाही याची काळजी घेत सतत चमच्याने ढवळत राहा.
-रवा भाजल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्या.
-त्यांनतर पुन्हा कढईत तेल ठेऊन गरम करा.
-तेलात चिरलेला कांदा टाकून भाजून घ्या.
-नंतर यामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता, मिर्ची घालून भाजून घ्या.
-आता त्यात काजू, मूग डाळ किंवा उडीद डाळ टाकून पुन्हा भाजून घ्या.
-त्यांनंतर १ कप रव्यासाठी त्या मिश्रणात २.५ कप पाणी ठेवा.
-पाण्यातच चवीनुसार मीठ टाका. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या.
-पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा टाका.
-हलक्या हाताने चांगले ढवळून घ्या. रव्याच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या.
-आता त्यावर कोथिंबीर टाकून गरमागरम उपीट सर्व्ह करा.