Breakfast: सकाळी नाश्ता न केल्याने आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, वाचा होणारे साइड इफेक्ट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast: सकाळी नाश्ता न केल्याने आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, वाचा होणारे साइड इफेक्ट

Breakfast: सकाळी नाश्ता न केल्याने आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, वाचा होणारे साइड इफेक्ट

Published Oct 17, 2024 09:09 AM IST

what happens if you don't have breakfast: श्ता वगळल्याने शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Effects of not having breakfast
Effects of not having breakfast (freepik)

Effects of not having breakfast:  नाश्त्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण त्याचबरोबर अनेक पोषक घटकही मिळतात. म्हणजे आपल्या उत्तम आरोग्यासाठी नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. हे माहीत असूनही अनेकजण सकाळचा नाश्ता टाळतात. सकाळी प्रचंड धावपळ असते हे उघड आहे. काहींना ऑफिसला तर काहींना कॉलेजला जावं लागतं. अशी परिस्थिती अधूनमधून आली तर हरकत नाही. पण हे रोजच होत असेल तर, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. नाश्ता वगळल्याने शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. जर तुम्ही देखील कोणत्याही कारणास्तव नाश्ता सोडत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. चला जाणून घेऊया नेमके काय परिणाम होतात.

सकाळचा नाश्ता न केल्याने आरोग्याच्या 'या समस्या उद्भवू शकतात-

साखरेची पातळी वाढू शकते-

सकाळी नाश्ता न केल्याने रक्तातील साखरेची पातळीत चढ-उतार होते. सकाळी नाश्ता केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकस आहाराने केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंतीही कमी होते.

वजन वाढू लागते-

बहुतांश लोकांना आश्चर्य वाटेल पण, दररोज नाश्ता वगळल्यानेही वजन वाढण्याचा धोका वाढतो. सकाळचा नाश्ता न केल्यावर, तुम्ही दुपारचे जास्त अन्न खाणार. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे न चुकता नाश्ता करणे गरजेचे आहे.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते-

नाश्ता वगळणे म्हणजे तुमची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होणे. रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये ७-८ तासांचे अंतर असते. अशा स्थितीत जर तुम्ही सकाळचा नाश्ताही केला नाही तर त्यामुळे पेशींना नुकसान होऊ लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशींना निरोगी ठेवायचे असेल तर नाश्ता जरूर करा.

पचनक्रिया मंदावते-

जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर त्यामुळे पचनक्रिया मंदावण्यास सुरुवात होते. सकाळचा नाश्ता तुमची पचनक्रिया वाढवते. म्हणजेच, जर तुम्ही नाश्ता केला नाही तर पचनक्रिया मंद होईल ज्यामुळे कमी कॅलरीज बर्न होतील. आणि पुन्हा तुमचे साजन वाढायला लागेल. त्यामुळे वेळेत नाश्ता करणे गरजेचे आहे.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner