Rasgulla Recipe: उरलेल्या ब्रेडपासून घरीच बनवा टेस्टी रसगुल्ले! मोजक्याच साहित्यात बनतील अगदी झटपट-bread rasgulla recipe make delicious rasgulla at home from bread ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rasgulla Recipe: उरलेल्या ब्रेडपासून घरीच बनवा टेस्टी रसगुल्ले! मोजक्याच साहित्यात बनतील अगदी झटपट

Rasgulla Recipe: उरलेल्या ब्रेडपासून घरीच बनवा टेस्टी रसगुल्ले! मोजक्याच साहित्यात बनतील अगदी झटपट

Aug 07, 2024 04:29 PM IST

Bread Rasgulla Recipe: तुम्हीही उरलेला ब्रेड फेकून देत असाल तर, पुढच्या वेळी असे अजिबात करू नका आणि त्याऐवजी एक चविष्ट गोड पदार्थ तयार करा.

ब्रेड रसगुल्ला बनवण्याची रेसिपी
ब्रेड रसगुल्ला बनवण्याची रेसिपी

Bread Rasgulla Recipe:  अनेकदा आपण नाश्त्यामध्ये सँडविच आणि टोस्ट बनवत असतो. हे पदार्थ बनवल्यानंतर घरामध्ये ब्रेड उरतो. अशा परिस्थितीत ही उरलेले वाळले ब्रेड खाणे कुटुंबातील कोणालाही आवडत नाही. त्यामुळे बहुतेक घरांमध्ये उरलेला ब्रेड नंतर फेकून दिला जातो. जर तुम्हीही उरलेला ब्रेड फेकून देत असाल तर, पुढच्या वेळी असे अजिबात करू नका आणि त्याऐवजी एक चविष्ट गोड पदार्थ तयार करा. या चविष्ट मिठाईच्या रेसिपीचे नाव आहे ब्रेड रसगुल्ला. 

ब्रेड रसगुल्ला हा मावा किंवा खव्याने बनवला जात नाही तर ब्रेडच्या मदतीनेसुद्धा बनवला जातो. इतर रसगुल्ल्यांप्रमाणेच हा रसगुल्लासुद्धा खायला खूप चविष्ट लागतो. हा रसगुल्ला बनवायला खूप सोपा आहे. चला तर मग विलंब न करता ब्रेड रसगुल्ला कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

ब्रेड रसगुल्ला बनवण्यासाठी साहित्य-

- ५ ब्रेड स्लाइस

- १ कप दूध

- १ कप साखर

- १ कप पाणी

- १/२ टीस्पून वेलची पावडर

-१/४ कप चिरलेला काजू

- १ टीस्पून लिंबाचा रस

 

ब्रेड रसगुल्ला बनवण्याची रेसिपी-

ब्रेड रसगुल्ला बनवण्यासाठी प्रथम ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घ्या. आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. आता एका कढईत दूध गरम करून त्यात लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्या. दुध फाटल्यानंतर ते एका मऊ कापडाच्या मदतीने गाळून त्यामधून पनीरसारखा भाग बाजूला काढा. यानंतर, ते मिश्रण थंड पाण्याने चांगले धुवून घ्या. आणि ब्रेडच्या तुकड्यांमध्ये मिसळा. पनीर आणि ब्रेड नीट एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या.

आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून बाजूला ठेवा. यानंतर रसगुल्ल्याचा पाक तयार करूया. पाक तयार करण्यासाठी एका पातेल्यात पाणी आणि साखर उकळा, त्यात वेलची पूडही घाला. पाक तयार झाल्यावर त्यात आधीच तयार करून ठेवलेले गोळे घालून १५ मिनिटे उकळवा. तुमचा चविष्ट ब्रेड रसगुल्ला तयार आहे. तयार रसगुल्ले पाकातून काढून त्यात ड्रायफ्रुट्स टाका, आणि फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.

विभाग