Brain Health : रोजच्या आयुष्यात ‘हे’ छोटे छोटे बदल करून राहू शकता स्ट्रोकपासून दूर! जाणून घ्या...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brain Health : रोजच्या आयुष्यात ‘हे’ छोटे छोटे बदल करून राहू शकता स्ट्रोकपासून दूर! जाणून घ्या...

Brain Health : रोजच्या आयुष्यात ‘हे’ छोटे छोटे बदल करून राहू शकता स्ट्रोकपासून दूर! जाणून घ्या...

Nov 02, 2024 02:40 PM IST

Stroke Prevention Tips :स्ट्रोक हा सामान्यत: जेव्हा मेंदूच्या भागांमध्ये रक्तप्रवाहात व्यत्यय येतो किंवा थांबतो तेव्हा होतो. हे कोणालाही कधीही होऊ शकते.

Stroke Prevention Tips
Stroke Prevention Tips (freepik)

Stroke Prevention Tips : उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, बैठी जीवनशैली यासारख्या काही जोखीम घटकांमुळे एखाद्याला स्ट्रोक होण्याची शक्यता असते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या सहकार्याने लॅन्सेट मेडिकल जर्नलच्या अभ्यासात २०५०पर्यंत भारतासह कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे १० दशलक्ष मृत्यू होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २०२०मध्ये ६.६ दशलक्षवरून २०५० पर्यंत ९.७ दशलक्षपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यातून हे स्पष्ट होते की, भारतात स्ट्रोकच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. १.२९ दशलक्ष नवीन प्रकरणे आणि ९.६५ दशलक्ष प्रकरणे, त्यानंतर इंडोनेशिया आणि बांगलादेश यांचा क्रमांक येतो. 

डॉ. निर्मल सूर्या म्हणतात, ‘स्ट्रोक ही एक वैद्यकिय आणीबाणी आहे, जी आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम करू शकते. स्ट्रोक हा सामान्यत: जेव्हा मेंदूच्या भागांमध्ये रक्तप्रवाहात व्यत्यय येतो किंवा थांबतो तेव्हा होतो. हे कोणालाही कधीही होऊ शकते. यामुळे आरोग्याच्या गुंतागुंतीसह मेंदूला गंभीर नुकसान होण्याचा धोका वाढू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, मद्यपान, उच्च कोलेस्टेरॉल आणि धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन अशा कोणत्याही स्वरूपात निकोटीनचे सेवन असे अनेक जोखीम घटक आहेत. आपले आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत काळजी घेणे आणि आवश्यक सावधगिरींचे पालन करणे गरजेचे आहे. हे जोखीम घटक वेळीच ओळखणे आणि समजून घेणे संबंधीत व्यक्तींना आरोग्याविषयी माहितीपूर्ण निवडी करण्यात मदत करू शकते. केवळ जीवनशैलीतील चांगले बदल करुनही स्ट्रोकचा धोका कमी करता येऊ शकतो.

Stroke Care : कुणाला असू शकतो स्ट्रोकचा सर्वाधिक धोका? जाणून घ्या कसा नियंत्रणात ठेवता येईल हा आजार

कसा कराल जीवनशैलीत बदल?

रक्तदाब व्यवस्थापित करा : जर तुम्हाला उच्च रक्तदाबासारखी समस्या असेल, तर तुम्ही विशेष खबरदारी घेतली पाहिजे. बऱ्याच लोकांमध्ये स्ट्रोकसाठी उच्च रक्तदाब हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. नियमितपणे तपासणी करून तुमच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवू शकता. पॅकेज फुड केलेले किंवा जंक फूडसारखे सोडियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थांचे सेवन टाळा.

धूम्रपान आणि तंबाखूसारख्या कोणत्याही स्वरूपात निकोटीनचे सेवन टाळा : धूम्रपानासारख्या वाईट सवयी तुमच्या पक्षाघाताच्या जोखमीवर लक्षणीय परिणाम करू शकतात. हे तुमच्या रक्तवाहिन्यांवर नकारात्मकरित्या परिणाम करतात, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जास्त प्रमाणात प्लेक तयार होतो. धूम्रपान सोडल्याने पुढील आयुष्यात स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. धूम्रपानाची सवय टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

मधुमेहाची पातळी नियंत्रित करा : मधुमेहासारख्या आजारामुळे स्ट्रोकसह अनेक आरोग्यविषयक गुंतागुंत निर्मांण होऊ शकतात. जर, तुम्हाला मधुमेह असेल तर तुमची साखरेची पातळी निरोगी श्रेणीत ठेवणे महत्त्वाचे ठरते. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे तुम्ही नियमितपणे घेत असल्याची खात्री करा. जीवनशैलीत बदल जसे की, संतुलित आहार खाणे आणि शारीरिकरित्या सक्रिय राहणे हे मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकते.

सकस आहार घ्या : पुरेशा पोषक तत्वांचा समावेश असलेले निरोगी आणि संतुलित आहार स्ट्रोक टाळण्यास मदत करू शकते. चांगल्या परिणामांसाठी तुमच्या आहारात भरपूर ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, मसूर, शेंगा, सुकामेवा, तेलबिया आणि प्रथिनाचा समावेश करा. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स, ट्रान्स फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल असलेले पदार्थ खाणे टाळा. हे सर्व घटक एकत्रितपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात.

नियमितपणे व्यायाम करा : स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले राहिल आणि वजन नियंत्रित राखण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. यामध्ये चालणे, जिमला जाणे, कार्डिओ, योगा, ध्यान, सायकलिंग, जॉगिंग आणि पोहणे यांचा समावेश होतो.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner