Carrot Benefits: डोळ्यांपासून इम्युनिटीपर्यंत निरोगी ठेवते गाजर, हिवाळ्यात खाल्ल्याने मुलांना मिळतात हे फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Carrot Benefits: डोळ्यांपासून इम्युनिटीपर्यंत निरोगी ठेवते गाजर, हिवाळ्यात खाल्ल्याने मुलांना मिळतात हे फायदे

Carrot Benefits: डोळ्यांपासून इम्युनिटीपर्यंत निरोगी ठेवते गाजर, हिवाळ्यात खाल्ल्याने मुलांना मिळतात हे फायदे

Dec 23, 2023 02:33 PM IST

Winter Health Tips for Kids: हिवाळ्यात बाजारात मुबलक प्रमाणात गाजर मिळतात. याचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला जातो. गाजर खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते जाणून घ्या.

हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने मुलांना होणारे फायदे
हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने मुलांना होणारे फायदे (unsplash)

Health Benefits of Eating Carrot for Kids During Winter: सलाद असो वा सूप गाजरचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला जातो. लाल रंगाचे गाजर हिवाळ्यात फक्त चवीला चांगले नाही तर ते आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे देखील देतात. भाज्या, सलाद, हलवा, ज्यूस किंवा सूप बनवण्यासाठी गाजराचा वापर केला जातो. गाजरमध्ये असलेले कॅरोटीनॉइड्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. आरोग्यासाठी फायदेशीर असलेले गाजर खाल्ल्याने मुलांना कोणते आश्चर्यकारक फायदे होतात ते जाणून घेऊया.

हिवाळ्यात गाजर खाल्ल्याने मुलांना मिळतात हे फायदे

डोळ्यांसाठी फायदेशीर

गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन दृष्टी सुधारण्यासाठी चांगले मानले जाते. हे रेटिनाच्या वाढीस मदत करते. जर तुमच्या मुलाचे डोळे कमकुवत असतील तर त्याच्या आहारात गाजराचा समावेश करा. याशिवाय गाजरात असलेले व्हिटॅमिन सी मॅक्युलर डिजेनेरेशन कमी करून डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे डोळ्यांचे आजार, अंधत्व, कमी दृष्टी इत्यादी डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो.

प्रतिकारशक्ती मजबूत ठेवते

इम्युनिटी कमकुवत असेल तर बदलत्या हवामानात लहान मुले सहज आजारी पडतात. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या मुलांना लवकर होऊ लागतात. अशा समस्या टाळण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी दररोज गाजर खायला द्या. रक्तातील प्लेटलेट्स आणि लिम्फोसाइट्स हे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. गाजर या दोन गोष्टी वाढवून मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम करते.

जखमा लवकर भरण्यास मदत

गाजरातील पोषक घटक लहान मुलांच्या पेशी वाढण्यास मदत करतात. गाजरात अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे मुलांच्या जखमा लवकर बऱ्या होतात.

पचनाच्या समस्या दूर करते

गाजरातील फायबर पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे यासारख्या पाचन समस्या दूर करण्यात मदत करू शकते. लहान मुलांना गाजराचा रस दिल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

चयापचय वाढवते

गाजरात भरपूर फायबर असल्यामुळे चयापचय वाढवून आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया निरोगी ठेवण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले बीटा कॅरोटीन आणि सेंद्रिय संयुगे शरीराला अनेक संसर्गजन्य आजारांपासून वाचवतात. जे कोणत्याही आजारानंतर व्यक्तीचे शरीर लवकर बरे होण्यास मदत करते.

 

लठ्ठपणा

गाजरातील कमी कॅलरीजचे सेवन केल्याने चयापचय सुधारते. हे वजन कमी करणे देखील सोपे करते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही सॅलड, सूप आणि रस स्वरूपात गाजर वापरू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner