Book Lovers Day 2024: पुस्तक हा मानवाला आयुष्य जगण्याची कला शिकवतो. पुस्तक एखाद्या गुरूप्रमाणे दररोज माणसाला नवीन ज्ञान देतो. त्यामुळेच अनेक लोकांना पुस्तकात आपला खरा मित्र दिसतो. पुस्तकातून आपल्याला विविध गोष्टींचे अनुभव घेता येतात. बसल्या ठिकाणी आपल्याला जीवन जगण्याचे मंत्र मिळते. त्यामुळे अनेकांना पुस्तके वाचायची आवड असते. पुस्तके हे आपले आयुष्य बदलण्याचे महत्वाचे साधन आहे. पुस्तकाद्वारे आपण स्वतःला ओळखू शकतो आणि आपले ज्ञान वाढवू शकतो. पण पुस्तकांची जागा आता स्मार्टफोन आणि गॅजेट्सने घेतली आहे. त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याउलट पुस्तकांमुळे आपले आरोग्य सुधारण्यास आणि मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे मुलांची पुस्तकांबद्दलची आवड वाढवण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत. शिवाय आयुष्य बदलण्यासाठी आपल्या काही पुस्तके अवश्य वाचली पाहिजेत. अशीच काही पुस्तके आज आपण पाहणार आहोत.
श्रीमान योगी ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित ही कादंबरी आहे. ही कादंबरी प्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांनी लिहली आहे. हे मराठी साहित्यातील सर्वात महत्वाच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी ही कादंबरी नक्की वाचावी.
ययाती ही एक कादंबरी आहे. प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार वि. स. खांडेकर यांनी लिहिली आहे. वास्तविक पौराणिक घडामोडींवर आधारित असेलेली ही कादंबरी भारतीय साहित्यात या कादंबरीला विशेष स्थान आहे. या कादंबरीसाठी वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ब्राझील लेखक पाउलो कोएलो यांनी 'द अल्केमिस्ट' हे पुस्तक लिहिले आहे. जगभरात सर्वात जास्त विक्री झालेल्या पुस्तकांपैकी म्हणून द अल्केमिस्ट या पुस्तकाची ओळख आहे. १९८८ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे तब्बल ७० भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. हे पुस्तक म्हणजे ऐडालुसियातील सँटियागो या तरुण मेंढपाळाच्या प्रवासाची कथा आहे. ज्याने आपल्या आयुष्याचा उद्देश जाणण्यासाठी प्रवास केला होता.
दक्षिण आफ्रिकेचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे हे आत्मचरित्र आहे. हे आत्मचरित्र आपल्याला मंडेला यांचे जीवन, त्यांचा तुरुंगवास आणि दक्षिण आफ्रिकेचा स्वातंत्र्यलढा यांची ओळख करून देते. चिकाटी, जिद्द आणि वांशिक समानतेसाठी संघर्षाची एक शक्तिशाली आणि प्रेरणादायी कथा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.
'माय ऑटोबायोग्राफी' हे प्रसिद्ध कॉमेडियन चार्ली चॅप्लिनचे आत्मचरित्र आहे. आपल्याला त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून, जीवनातील संघर्षापासून ते आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळविण्यापर्यंतच्या प्रवासातील रोमांच अनुभवता येतो. विनोदाची आणि त्यामागे दडलेल्या वेदनेची एक रंजक कथा आहे.
हेजगभरात प्रसिद्ध असलेले हे पुस्तक स्टीव्ह सीबोल्ड यांनी लिहिले आहे. स्टीव्ह यांनी तब्बल १ हजार श्रीमंत लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अशा सर्व गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यामुळे माणसाला श्रीमंत होण्यास मदत होते.