Confidence: नेहमी आपण ऐकले असेल की आपल्या शब्दांपेक्षा कृती जास्त प्रभावपणे बोलते. कारण तुमची बोलण्याची पद्धत, तसेच तुमची चालण्याची आणि बसण्याची पद्धत तुमच्याबद्दल बरेच काही सांगते. बॉडी लँग्वेज तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सांगते. इतर लोकांमध्ये आपले सर्वोत्तम व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, आपण केवळ आपल्या बोलण्याच्या पद्धतीकडेच नव्हे तर आपल्या बॉडी लँग्वेज कडे देखील लक्ष दिले पाहिजे. समोरच्या व्यक्तीशी बोलताना आपली बॉडी लँग्वेज कशी आहे त्यावरून समोरची व्यक्ती आपल्याला जज करू शकते. तुम्ही व्यावसायिक मिटींग्स आणि तर कामाच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची देहबोली अवलंबली पाहिजे हे जाणून घ्या. जेणेकरून समोरच्या व्यक्तीवर तुमची चांगली छाप पडेल.
जेव्हा आपण एखाद्याला पहिल्यांदा भेटतो तेव्हा त्याच्या लूक आणि बॉडी लँग्वेज बघून त्या व्यक्तीबद्दल एक प्रतिमा तयार करतो. त्यामुळे नेहमी सरळ बसावे. पाठ सरळ आणि मागे असावी. आपल्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर ठरते. शरीर आकडून बसू नये.
तुमच्या बोलण्याचा टोन खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही तुमचा मुद्दा समोरच्या व्यक्तीसमोरआत्मविश्वासाने मांडता आला पाहिजे. पण यावेळी शब्दांची निवड आणि बोलण्याचा टोन बरोबर ठेवला पाहिजे.
कोणत्याही बिझनेस मीटिंगपूर्वी चिंता वाटणे अगदी सामान्य आहे. परंतु अशा परिस्थितीत शांत,रिलेक्स राहा, कारण तुमच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन आणि बॉडी लँग्वेज तुमच्या मनातील तणाव आणि भीती दर्शवू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या