Body Care: मान खूपच काळी झालीय, चारचौघांच्यात सतत लपवावी लागते? या उपायाने क्षणात होईल क्लिन
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Body Care: मान खूपच काळी झालीय, चारचौघांच्यात सतत लपवावी लागते? या उपायाने क्षणात होईल क्लिन

Body Care: मान खूपच काळी झालीय, चारचौघांच्यात सतत लपवावी लागते? या उपायाने क्षणात होईल क्लिन

Published Aug 15, 2024 11:49 AM IST

Home Remedies to get rid of dark neck: मानेच्या काळेपणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या महागड्या क्रीम आणि प्रॉडक्टस वापरतात. परंतु त्यामध्ये हानिकारक रसायने असतात जी त्वचेला हानी पोहोचवू शकतात.

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Home Remedies to get rid of dark neck: प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीराची योय ती निगा राखणे गरजेचे असते. बहुतांश लोक चेहऱ्याची अतिशय सुंदरप्रकारे काळजी घेतात. परंतु अशावेळी मानेची निगा राखणे विसरून जातात. त्यामुळे मानेभोवती घाण साचू लागते आणि ती त्वचा काळी पडते. मानेचा काळेपणा खूप वाईट दिसतो. यामुळे अनेकवेळा आपल्याला चारचौघांमध्ये लाज बसायला लाज वाटू लागते. शिवाय सतत मान लपवण्याची गरज भासू लागते. मानेच्या काळेपणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या महागड्या क्रीम आणि प्रॉडक्टस वापरतात. परंतु त्यामध्ये हानिकारक रसायने असतात जी त्वचेला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मान तर स्वच्छ होईलच शिवाय ग्लोसुद्धा करेल.

दही आणि हळद-

काळ्या मानेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दही आणि हळद वापरू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे दही घ्या. त्यात चिमूटभर हळद टाकून नीट मिसळा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि सुमारे २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ते पाण्याने धुवून स्वच्छ करा. ही क्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्याने तुम्हाला लवकरच फरक दिसू लागेल. आणि काहीच दिवसांत तुमच्या मानेचा काळेपणा पूर्णपणे दूर होण्यास मदत होईल.

गुलाबजल आणि बेसन-

काळवंडलेल्या मानेची समस्या दूर करण्यासाठी बेसन आणि गुलाबजल वापरता येते. यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन घ्या. दोन चमचे गुलाबजल आणि चिमूटभर हळद घालून मिक्स करा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि काही वेळ राहू द्या. वाळल्यानंतर म्हणजेच जवळपास २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता. असे केल्यास तुमची मान स्वच्छ आणि सुंदर दिसेल.

बेकिंग सोडा-

काळी मान साफ ​​करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. त्यामुळे त्वचेवरील घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. शिवाय त्वचेचा रंग सुधारतो. यासाठी बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट मानेवर लावा आणि कोरडी होईपर्यंत राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करून धुवून टाका. आठवड्यातून ३ ते ४ वेळा याचा वापर केल्याने मानेचा काळेपणा मोठ्याप्रमाणात दूर होईल.

मध आणि लिंबू-

मध आणि लिंबू यांचे मिश्रण मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. हे मिश्रण वापरण्यासाठी एक चमचा मधात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. नंतर दोन्ही पदार्थ चांगले मिसळा. ही पेस्ट मानेवर लावा आणि वाळेपर्यंत तशीच ठेऊन द्या. साधारण १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ४ वेळा याचा वापर केल्याने तुमची काळी मान साफ ​​होईल. शिवाय ग्लोसुद्धा येईल.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner