Body Care: अंडरआर्म्सच्या काळेपणाने त्रस्त आहात, स्लिव्हलेस घालणे टाळता? 'हे' घरगुती उपाय ठरतील उपयुक्त-body care tips try these home remedies if your underarms are very dark ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Body Care: अंडरआर्म्सच्या काळेपणाने त्रस्त आहात, स्लिव्हलेस घालणे टाळता? 'हे' घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

Body Care: अंडरआर्म्सच्या काळेपणाने त्रस्त आहात, स्लिव्हलेस घालणे टाळता? 'हे' घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

Sep 11, 2024 11:38 AM IST

Tips for dark underarms: काहीवेळा काळे अंडरआर्म्स खूप वाईट दिसतात, तर काही वेळा ते लाजिरवाणेदेखील बनतात.अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर या घरगुती उपाय करून पाहा.

home remedies for dark underarms - काळ्या अंडरआर्म्सवर उपाय
home remedies for dark underarms - काळ्या अंडरआर्म्सवर उपाय

Home remedies for dark underarms:  काळ्या अंडरआर्म्समुळे तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रेस घालू शकत नसाल किंवा लोकांसमोर लाजत असाल, तर हे घरगुती उपाय तुमची समस्या सोडवण्यात मदत करू शकतात. अंडरआर्म्स काळे होण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये अंडरआर्म्स नीट साफ न करणे, जास्त घट्ट कपडे घातल्याने घर्षण, केस स्वच्छ करण्यासाठी रेझर वापरणे, त्वचेवर डेड स्किन जमणे ही मुख्य कारणे आहेत. काहीवेळा काळे अंडरआर्म्स खूप वाईट दिसतात, तर काही वेळा ते लाजिरवाणेदेखील बनतात.अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर या घरगुती उपाय वापरून पाहा. जाणून हे उपाय नेमके कोणते आहेत.

बेकिंग सोडा आणि पाणी-

काळ्या अंडरआर्म्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा पाण्यात मिसळून लावू शकता. यासाठी एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात १ चमचा पाणी घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण तुमच्या अंडरआर्म्सवर लावा आणि सुमारे ३० मिनिटे राहू द्या. यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे अंडरआर्म्सचा काळेपणा दूर होईल.

बेकिंग सोडा आणि हळद-

काळ्या अंडरआर्म्सपासून सुटका होण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि हळद वापरू शकता. यासाठी एका भांड्यात १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात एक चमचा मध, एक चमचा पाणी आणि चिमूटभर हळद घालून चांगले मिसळा. नंतर ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा. १५-२० मिनिटांनी पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करू शकता. बेकिंग सोडा आणि हळद या दोन्हीमध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत. त्वचेचा काळेपणा दूर करण्यासोबतच रंग सुधारण्यासही मदत होते.

मध आणि हळद-

अंडरआर्म्सचे काळे डाग दूर करण्यासाठी प्रथम एका भांड्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा मध, एक चमचा गुलाबजल किंवा कच्चे दूध घालून चांगले मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट काळ्या अंडरआर्म्सवर लावा आणि २० मिनिटे राहू द्या. नंतर अंडरआर्म्स साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

खोबरेल तेल-

खोबरेल तेल खूप उपयुक्त मानले जाते. त्यात नैसर्गिक त्वचा उजळणारे व्हिटॅमिन ई गुणधर्म असतात. दररोज फक्त तुमच्या अंडरआर्म्सला खोबरेल तेलाने मसाज करा आणि पंधरा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय तुम्ही करू शकता.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग