Body Care: फॅशनच्या नावाखाली एकदम टाइट कपडे घालता? थांबा, आरोग्यावर होतील भयानक परिणाम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Body Care: फॅशनच्या नावाखाली एकदम टाइट कपडे घालता? थांबा, आरोग्यावर होतील भयानक परिणाम

Body Care: फॅशनच्या नावाखाली एकदम टाइट कपडे घालता? थांबा, आरोग्यावर होतील भयानक परिणाम

Oct 17, 2024 10:42 AM IST

why not to wear tight clothes: घट्ट कपडे परिधान केल्याने तुम्ही चांगले दिसू शकता, परंतु यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

Side effects of wearing tight clothes
Side effects of wearing tight clothes (freepik)

Side effects of wearing tight clothes:  फॅशनच्या नावाखाली टाईट कपड्यांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकजण टाईट कपडे घातलेला दिसतो. घट्ट कपडे परिधान केल्याने तुम्ही चांगले दिसू शकता, परंतु यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लोकांनी नेहमी आरामदायी आणि सैल कपडे घालावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील. घट्ट कपड्यांचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. टाईट अंडरवेअर आणि इतर कपड्यांचे तोटेही अनेक संशोधनातून समोर आले आहेत.

रिसर्चगेटच्या अहवालानुसार, खूप घट्ट कपडे परिधान केल्यास शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. जेव्हा कपडे खूप घट्ट असतात तेव्हा ते रक्तवाहिन्यांवर दबाव टाकतात. रक्त प्रवाह कमी करतात. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास शिरांमध्ये सूज किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो. घट्ट कपडे परिधान केल्याने त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. जेव्हा कपडे शरीराच्या संपर्कात येतात तेव्हा त्वचेवर सूज किंवा पुरळ येऊ शकतात. कपडे सिंथेटिक मटेरिअलचे बनलेले असल्यास ते घाम शोषत नाहीत. ज्यामुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका वाढतो.

पोट लपवण्यासाठी लोक अनेकदा घट्ट जीन्स किंवा पँट घालू लागतात. परंतु याचा पोटाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा कपड्यांमुळे पोटाभोवती दाब पडतो आणि गॅस, ॲसिडिटी किंवा अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात. सारखे कपडे जास्त काळ घातल्यास या समस्या आणखी वाढू शकतात. खूप घट्ट कपडे परिधान केल्याने लोकांना अस्वस्थ वाटू शकते. ज्यामुळे तणाव आणि चिंता होऊ शकते. बऱ्याच लोकांना त्यांच्या शरीराबद्दल असुरक्षित देखील वाटते. ज्याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. याच कारणामुळे घट्ट म्हणजेच टाईट कपडे मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत.

जेव्हा कपडे खूप घट्ट असतात तेव्हा त्यामुळे स्नायूंचा ताण आणि वेदना होऊ शकतात. घट्ट कपडे शरीराला पुरेशी हालचाल करू देत नाहीत. त्यामुळे पाठ, मान आणि खांद्यावर वेदना जाणवतात. त्यामुळे लोकांना दैनंदिन कामे करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. खूप घट्ट कपडे परिधान केल्याने चालणे, बसणे किंवा वाकणे यासारख्या सामान्य क्रियाकलाप करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे दिवसभर लोकांचे हाल होऊ शकतात. हे विशेषतः अशा लोकांसाठी कठीण असू शकते ज्यांना कामाच्या दरम्यान शारीरिकरित्या सक्रिय असणे आवश्यक आहे. अशा लोकांना सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच दररोज टाईट कपडे घालणे शक्यतो टाळा. त्याच्याएवजी सैलसर शरीराला आराम देणारे कपडे परिधान करा.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner