मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Saree Look: मकर संक्रांतला काळी साडी नेसणार असाल तर या सेलिब्रिटींकडून घेऊ शकता स्टाईल टिप्स

Saree Look: मकर संक्रांतला काळी साडी नेसणार असाल तर या सेलिब्रिटींकडून घेऊ शकता स्टाईल टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 14, 2024 11:33 PM IST

Makar Sankrati Fashion Tips: मकर संक्रांतला काळी साडी घालण्याचे ट्रेंड आहे. तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतला काळी साडी नेसायची असेल तर या सेलिब्रिटीच्या लूकवरून प्रेरणा घेऊ शकता.

सेलिब्रिटींचे ब्लड साडी लूक
सेलिब्रिटींचे ब्लड साडी लूक

Celebrity Inspired Black Saree Look: काळ्या साडीची स्वतःची क्रेझ आहे. त्यातही मकर संक्रांतला काळ्या रंगाच्या कलरला विशेष महत्त्व आहे. महिला पार्टीसाठी काळ्या रंगाची साडीला पसंती देतात. तुम्हालाही यंदाच्या संक्रांतीला काळी नेसण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या अभिनेत्रींच्या लूकवरून स्टाइल टिप्स घेऊ शकता. त्यांच्या ब्लाऊजने त्यांच्या लूकला आणखी गॉर्जियस बनवले आहे.

दिव्या खोसला कुमारचा ब्लॅक साडी लूक

दिव्या खोसला कुमार आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीत ऑल ब्लॅक लूकमध्ये पोहोचली. तिने ब्लॅक आणि गोल्ड बॉर्डर असलेल्या प्लेन साडीसोबत हेवी वर्क ब्लाउज निवडला. ज्याची डिझाईन खास होती. हॉल्टर नेक आणि कीहोल डिझाइन असलेल्या ब्लाउजमध्ये दिव्या खोसला आकर्षक दिसत होती. जर तुम्हाला हटके लूक हवा असेल तर तुम्ही हॉल्टर नेक ब्लाउज ट्राय करू शकता. त्याची बॅकलेस डिझाईन अतिशय एलिगंट लुक देते. तर मेसी हाय बन आणि रिम्ड ब्लॅक आयलायनर डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी पुरेसे आहेत.

मृणाल ठाकूरचा लूक आहे परफेक्ट

जर तुम्हाला स्किन शोऑफ न करता गॉर्जियस दिसायचे असेल तर मृणाल ठाकूरचा लूक एकदम परफेक्ट आहे. काळी चिकनकारी आणि शिमरी वर्कची साडी फुल स्लीव्ह ब्लाउजसोबत मॅच केली आहे. केसांमधले कर्ल, स्मोकी आइज, ड्युई मेकअप परफेक्ट स्टाइल इंस्पिरेशन देण्यासाठी पुरेसे आहेत.

मानुषी छिल्लर हॉट लुक

ब्लॅक कॉर्सेट ब्लाउजमध्ये नॉन-स्ट्रॅपी स्वीटहार्ट नेकलाइन आणि ट्रान्सपरंट बस्ट एरिया आहे. मानुषीने अशा ब्लाउजसोबत अगदी साधी काळी साडी निवडली आहे. ज्यामध्ये ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जर तुम्हाला सॉफ्ट आणि हॉट लुक हवा असेल तर तुम्ही लाइटवेट ईयररिंग्ससोबत बोल्ड स्टेटमेंट ब्लाउज आणि साधी शिफॉन साडी निवडू शकता.

 

नीता अंबानींचा ब्लक साडी लूक

आयरा खानच्या रिसेप्शनला मुकेश अंबानींसोबत आलेल्या नीता अंबानी यांनी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली काळी शिफॉन साडी निवडली आहे. यावरून हे दिसते की क्लासिक शिफॉन साडीची फॅशन कधीच आउट होत नाही. कोणत्याही प्रसंगी अशी साडी नेसून तुम्ही गॉर्जियस दिसू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel