Black Pepper Benefits : सारखं डोकं दुखतं आणि सर्दी होते? अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल मसाल्याच्या डब्यातील काळी मिरी!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Black Pepper Benefits : सारखं डोकं दुखतं आणि सर्दी होते? अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल मसाल्याच्या डब्यातील काळी मिरी!

Black Pepper Benefits : सारखं डोकं दुखतं आणि सर्दी होते? अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल मसाल्याच्या डब्यातील काळी मिरी!

Published Oct 30, 2024 05:23 PM IST

Health Benefits Of Black Pepper :काळी मिरी दिसायला लहान असली, तरी त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवू शकता.

Health Benefits Of Black Pepper
Health Benefits Of Black Pepper

Black Pepper Benefits In Marathi : किचनमध्ये असलेले अनेक मसाले आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. काळी मिरी देखील अशाच मसाल्यांपैकी एक आहे. दिसायला लहान असली, तरी त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवू शकता. आयुर्वेदात काळ्या मिरीचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे. केवळ एकच नाही, तर अनेक रोगांवर अतिशय फायदेशीर आणि गुणकारी असलेला हा मसाला एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. चला जाणून घेऊया त्याचे फायदे आणि उपयोग याबद्दल... 

काळी मिरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

तज्ज्ञांच्या मात्र, काळी मिरी हा एक असा मसाला आहे ज्याचे आयुर्वेदात तपशीलवार वर्णन आहे. हे केवळ एकच नाही तर अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे. काळी मिरी ही हंगामी आजारांसाठी औषधासारखी आहे. काळी मिरी जेवणात मसाला म्हणून वापरली जातेच. मात्र, यासोबतच तिच्यापासून काही घरगुती औषध उपचार देखील केले जाऊ शकतात.

Side Effects of Guava: 'या' लोकांना विषासमान आहे पेरू, चुकूनही खाऊ नये, अथवा बिघडेल आरोग्य

जाणून घ्या काळी मिरी खाण्याचे फायदे

डोकेदुखी : तांदळाच्या पाण्यात किंवा भृंगराज रसात काळी मिरी बारीक करून पेस्ट कपाळावर लावल्यास मायग्रेनच्या समस्येपासून आराम मिळतो.

गळणारे केस : डोक्यावरील केस गळत असतील तर कांदा आणि मीठ यांच्यासह काळी मिरी बारीक करून ही पेस्ट लावल्यास फायदा होतो.

खोकला आणि सर्दीवर गुणकारी : दीड ग्रॅम काळी मिरी पावडर गुळात मिसळून दिवसातून ३-४ वेळा सेवन केल्यास खूप फायदा होतो. किंवा गरम दुधात काळी मिरी पावडर टाकून सेवन करू शकता.

डोळ्यांचे आजार : अर्धा ग्रॅम काळी मिरी पावडर एक चमचा देशी तूप मिसळून खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारचे आजार दूर होतात.

दात आणि घशाचे आजार : काळी मिरी पावडर, ३-४ जांभूळ किंवा पेरूच्या पानांसह बारीक करून कोमट पाण्यात टाकून त्याने गुळण्या कराव्यात. हा उपाय दातदुखी, घशाचे आजार किंवा घशाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

दम्यावर गुणकारी : काळी मिरी पावडर मध आणि तुपात मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने सर्दी, खोकला, दमा, छातीत दुखणे यापासून आराम मिळतो. याचे सेवन केल्याने फुफ्फुसात जमा झालेला कफ बाहेर पडतो.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner