Today in History: पहिल्या भारतीय महिला डॉक्टरांचा जन्म ते अन्य घटना घडल्या आहेत ३१ मार्चच्या इतिहास
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Today in History: पहिल्या भारतीय महिला डॉक्टरांचा जन्म ते अन्य घटना घडल्या आहेत ३१ मार्चच्या इतिहास

Today in History: पहिल्या भारतीय महिला डॉक्टरांचा जन्म ते अन्य घटना घडल्या आहेत ३१ मार्चच्या इतिहास

Mar 31, 2023 11:42 AM IST

On This Day in History : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात ३१ मार्च या तारखेला नोंदलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घ्या.

Todays History
Todays History (Freepik)

31 March in Indian History: आपला इतिहास खूप जुना आहे हे आपण प्रत्येक वेळी ऐकतो, परंतु आपल्याला आपल्या देशाच्या इतिहासाची पूर्ण माहिती नसते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आजच्या दिवसाची खास माहिती घेऊन आलो आहोत. आजही आपण सर्वजण जे संविधान फॉलो करतो त्याचे निर्माते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर याना १९९० मध्ये, ३१ मार्च रोजी मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांनी समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला आजही देश सलाम करतो.

आजचा इतिहास

१५०४ - १५०४ मध्ये गुरू नानक देवजी यांच्यानंतर शिखांचे दुसरे गुरू अंगद देव जी यांचा जन्म झाला.

१७२७- आयझॅक न्यूटन यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी १७२७ मध्ये लंडनमध्ये निधन झाले.

१८७० मध्ये अमेरिकेत कृष्णवर्णीयांना समान अधिकार देण्याच्या दिशेने मोठे यश मिळाले. या दिवशी प्रथमच कृष्णवर्णीय व्यक्तीने मतदान केले.

१८४३ - मराठी नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म ३१ मार्च १८४३ रोजी झाला.

१८६५ - पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी झाला.

१९६४- १९६४ मध्ये, मुंबईमध्ये इलेक्ट्रिक ट्राम बंद करण्यात आल्या.

१९९०- ३१ मार्च १९९० रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

२००४- २००४ मध्ये अर्जेंटिनामधील नाईट क्लबला लागलेल्या आगीत १७५ लोकांचा मृत्यू झाला होता.

(वरील लेखात काही निवडक घटना दिल्या आहेत. या खेरीज इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या होत्या.)

Whats_app_banner