मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Anant Ambani Wedding: अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावतील ९ CEO, पाहा बिल गेट्सपासून मार्क झुकेरबर्गपर्यंतची गेस्ट लिस्ट

Anant Ambani Wedding: अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावतील ९ CEO, पाहा बिल गेट्सपासून मार्क झुकेरबर्गपर्यंतची गेस्ट लिस्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 25, 2024 10:01 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Wedding: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांची यादी येथे पाहा.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (HT)

Guest List of Anant Ambani Radhika Merchant Wedding: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांच्या घरी लग्नाची धामधुम सुरु झाली आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. लग्नसमारंभात १००० पाहुणे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि ॲडोबचे सीईओ शांतुनू नारायण उपस्थित राहणार आहेत.

कधी होणार लग्न?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईत होणार आहे. पण प्री-वेडिंग फंक्शन्स जामनगर, गुजरातमध्ये १ मार्च ते ३ मार्चया कालावधीत होतील. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार लग्नाआधीच्या फंक्शन्समध्ये मॉर्गन स्टॅनलेचे सीईओ टेड पिक, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ॲडनोकचे सीईओ सुलतान अहमद अल जाबेर आणि ईएल रॉथस्चाइल्डचे अध्यक्ष लिन फॉरेस्टर डी रॉथ्सचाइल्ड उपस्थित राहणार आहेत.

कतारचे पंतप्रधानही राहणार उपस्थित

याशिवाय बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष ब्रायन थॉमस मोयनिहान, ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष स्टीफन श्वार्झमन, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जस्सिम अल थानी, अडोबचे सीईओ शांतनु नारायण, लुपा सिस्टीमचे सीईओ जेम्स मर्डोक, हिलहाऊस कॅपिटलचे संस्थापक झांग लेई, बीपीचे सीईओ मरेऑचिनक्लोस, एक्सॉरचे सीईओ जॉन एल्कन आणि ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटचे सीईओ ब्रूस फ्लॅट हे देखील हजर राहणार आहेत.

अरिजित सिंग, रिहानाचे सूर आणि जादूगार डेव्हिडच्या ट्रिक्स

बॉलिवूडमधील काही यशस्वी गायकांमध्ये अरिजित सिंगचे नाव घेतले जाते, तर रिहानाचे नावही जगप्रसिद्ध आहे. हे दोघेही रंगमंचावर ड्युएट सादर करताना दिसतील. दोन्ही गायकांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. एकीकडे जगातील काही प्रसिद्ध आणि यशस्वी गायक स्टेजवर आपले गायन कौशल्य दाखवणार आहेत, तर दुसरीकडे जादूगार डेव्हिड ब्लेनही आपल्या अप्रतिम ट्रिक्सने सर्वांना थक्क करण्यासाठी सज्ज असणार आहे.

पाहुण्यांच्या यादीत आहेत हे बॉलिवूड स्टार्स

अंबानी कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात चाहत्यांची नजर बॉलीवूड स्टार्सवर नक्कीच असते. त्यामुळे या लग्नातही बॉलिवूडमधील अनेक मोठ्या नावांना आमंत्रित करण्यात आले आहे. या फंक्शनमध्ये बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार शाहरुख खान नक्कीच उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, सलमान खान, सैफ अली खान आणि धक धक गर्ल माधुरी दीक्षित देखील या हजेरी लावतील. एवढेच नाही तर या लग्नात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अजय देवगण, काजोल, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत.

WhatsApp channel