Bharti Singh Weight Loss Tips: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bharti Singh Weight Loss Tips: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा

Bharti Singh Weight Loss Tips: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 03, 2024 01:31 PM IST

Bharti Singh Weight Loss Tips: आजकाल वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कॉमेडीयन भारती सिंहने देखील अशीच मेहनत घेतली होती. भारतीचा वजन कमी करण्याचा नेमका काय होता फंडा चला जाणून घेऊया...

Bharti Singh
Bharti Singh

छोट्या पडद्यावरील 'लाफ्टर क्वीन' म्हणून भारती सिंग ओळखली जाते. तिने विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 'लल्ली' या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. भारती एक स्टँडअप कॉमेडियन असण्यासोबतच उत्तम रिअॅलिटी शो होस्ट देखील असल्याचे पाहायला मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का करिअरच्या सुरुवातीला भारतीचे वजन खूप जास्त होते. तिने आता जवळपास १५ किलो वजन कमी केले आहे. पण भारतीने हे कसे केले? असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया भारतीचा फिटनेस फंडा...

भारतीने खाण्याच्या सवयी बदलल्या होत्या

भारतीने खाणेपिणे अजिबात सोडले नव्हते. तिने वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या होत्या. भारतीने तिच्या आहाराचा खुलासा केला आहे. भारतीने सांगितले होते की, ती अनियमित वेळेत जेवण करायची. तिला सहज कंटाळा यायचा आणि बॉर्डर लाइन डायबेटिकही होती. वजन कमी केल्यानंतर भारतीने सांगितले की, तिच्या आरोग्याविषयीच्या अनेक समस्या कमी झाल्या आहेत. तिला हलके वाटू लागले आहे. या सवयींमुळे भारतीने जवळपास १५ किलो वजन कमी केले आहे.
Haunted Places Of India: 'ही' आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, जाण्यापूर्वी नक्की विचार करा

काय होता भारतीचा आहार

भारतीने सांगितले की ती संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ती रात्रीचे जेवण करायची. सकाळी ती १२ वाजता जेवत असते. तिने जवळपास १६ तासांच्या फास्टिंगचा रुल फॉलो केला होता. उरलेल्या ८ तासात ती सर्वकाही खात होती. रात्रीचा वेळ हा झोपण्यात जात असे त्यामुळे १६ तासांच्या फास्टिंगमध्ये बराच फायदा झाला. भारतीने असेही सांगितले होते की ती वरण, भात, तूप, लोणी, आलू पराठे असे सर्व पदार्थ ती खात होती. पण मध्येमध्ये फास्टिंग केल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ हे बाहेर टाकले जात होते. त्यामुळे चयापचनाची गती वाढत होती.
वाचा: पावसाळ्यात घराचे छत गळतय, फनिर्चरला बुरशी येतेय? वाचा कशी घ्यावी काळजी

मोजकेच खाणे

दिवसभर आपण काहीना काही पदार्थ खात असतो. त्यामुळे वजन पटकन वाढते. एकदाच खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने खात जा. तुम्ही यासोबतच ४५ मिनिटे ब्रिस्क वॉक केलात आणखी फायदा होऊ शकतो. तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होईल असे म्हटले जाते.
वाचा: लंच बॉक्समधून बाहेर येतात भाज्या किंवा तेल? 'या' सोप्या उपायांनी करा तुमचा टिफीन एअरटाइट

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner