कॉमेडी क्वीन भारती सिंह तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दररोज व्लॉग शेअर करते. या व्हिडिओंच्या माध्यमातून ती तिचे आयुष्य आणि खाण्यापिण्याच्या सवयीही शेअर करते. या व्हिडीओमध्ये ती आपल्या मुलाशी संबंधित अपडेट्सही देत असते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने मुलगा काय खातो आणि शाळेच्या डब्ब्यात काय घेऊन जातो हे देखील सांगितले आहे.
भारतीचा मुलगा सकाळी ७-७.३० वाजता उठतो. यानंतर तो सुमारे १२० मिली दूध पितो. मग ती त्याला ब्रश करून अंघोळ घालते. अंघोळीनंतर शेंगदाण्याचा नाश्ता देते. गोलाची शाळा फक्त एक ते दीड तास चालते. तो एक वाजता घरी येतो आणि जेवतो. मग संध्याकाळी त्याला काही तरी स्नॅक्स देते. जेवल्यानंतर तो खेळायला जातो आणि परत येतो. रात्री ९-९.३० वाजता जेवतो. रात्रीच्या जेवणानंतर काही तासांनी त्यांची मालिश केली जाते आणि नंतर गोलाला झोपवले जाते.
मॉर्निंग ब्रेकफास्ट- पराठ्यासोबत दही, भाजी (आलू, पनीर, पालक भुर्जी) किंवा अंडी
शाळेचे टिफिन-फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स, मुरमुरा
दुपारचे जेवण- डाळ, भात, सलाड आणि चपाती
संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काही तरी हलके पुलके
रात्रीचे जेवण- भाजी आणि डाळ खिचडी
भारती गोलाला ज्वारीचे पफ, भाजलेला हरभरा आणि मखाना देते. भारती गोलाला कधीच चॉकलेट देत नाही. पण त्याला चॉकलेट खायला आवडत असल्यामुळे भारतीने सुक्या मेव्याचे चॉकलेट बनवून त्याला खायला दिले आहे. त्यामुळे गोला सुक्या मेव्याला चॉकलेट बोलतो.
वाचा: 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?
भारती व्हिडीओमध्ये सांगते की ती मुलाला नेहमी तूप देते. यामुळे स्नायूंना बळ मिळते आणि शरीर मजबूत होते, असा त्यांचा विश्वास आहे. याशिवाय भारतीच्या मुलाला फळे खायला देखील आवडतात. पण त्याला आंबा हे फळ जास्त आवडत नाही.