मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Travel Package: उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ ५ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी! काय आहे IRCTCच्या पॅकेजमध्ये खास?

Travel Package: उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ ५ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी! काय आहे IRCTCच्या पॅकेजमध्ये खास?

Jun 22, 2024 12:38 PM IST

Jyotirlingas Of Madhya Pradesh Travel Package: आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला महाकालेश्वर मंदिर, सांदीपनी आश्रम, चिंतामण गणेश मंदिर, हरसिद्धी मंदिर आणि उज्जैनचे मंगलनाथ मंदिर पाहण्याची संधी मिळणार आहे.

उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ ५ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!
उज्जैनच्या महाकालेश्वरासह ‘या’ ५ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!

Jyotirlingas Of Madhya Pradesh Travel Package: आता पावसाळा आला की, अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडण्याचा विचार करतात. जर, तुम्हीही खूप दिवसांपासून एखाद्या धार्मिक सहलीला जाण्याचा विचार करत असाल, परंतु काही कारणांमुळे जाऊ शकत नसाल, तर आता उज्जैन आणि इंदूरच्या प्रसिद्ध मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची खास संधी चालून आली आहे. नुकतेच आयआरसीटीसीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सगळ्या प्रवाशांसाठी एक खास स्वस्त आणि खिशाला परवडणारे टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही देशातील प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता.

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला महाकालेश्वर मंदिर, सांदीपनी आश्रम, चिंतामण गणेश मंदिर, हरसिद्धी मंदिर आणि उज्जैनचे मंगलनाथ मंदिर पाहण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच तुम्ही ओंकारेश्वर आणि अखिलेश्वर मंदिरांनाही भेट देऊ शकणार आहात. चला तर, आयआरसीटीसीच्या या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती घेऊ...

Dahi Kadhi Recipe: दही कढी खायला आवडते? मग ‘या’ ३ प्रकारच्या चटपटीत रेसिपी नक्की करा ट्राय!

सर्वात स्वस्त ६ दिवसांचे टूर पॅकेज!

आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज भुवनेश्वर विमानतळावरून सुरू होईल. तिथून तुम्हाला विमानाने उज्जैन आणि नंतर इंदूरला नेले जाईल. ५ रात्री आणि ६ दिवसांचे हे टूर पॅकेज ६ सप्टेंबर २०२४पासून सुरू होईल. तुम्ही हे टूर पॅकेज घेतल्यास, तुम्हाला ५ दिवसांसाठी प्रवास, राहण्याची सुविधा आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. हे टूर पॅकेज भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘SCBA53’ या कोडसह उपलब्ध आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Women Health: नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?

किती आहे याची किंमत?

जर, तुम्ही या पॅकेज अंतर्गत एकाच व्यक्तीसाठी तिकीट बुक केले, तर तुम्हाला ४३,२२० रुपये मोजावे लागतील. तर, दोन व्यक्तींच्या पॅकेजची किंमत ३४,४४५ रुपये प्रति व्यक्ती मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही तीन लोकांसाठी तिकीट खरेदी केले, तर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती ३३,८३० रुपये असेल. जर, तुमच्यासोबत ५ ते ११ वर्षे वयोगटातील मूल असेल, ज्यासाठी तुम्हाला तिथे राहण्यासाठी स्वतंत्र बेडची आवश्यकता असेल, तर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २८,८५५ रुपये आहे. तुमच्यासोबत ५ ते ११ वर्षांपर्यंतचे मूल असल्यास, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा बेड नको असेल, तर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २७,९३० रुपये आहे.

कशी कराल ऑनलाईन बुकिंग?

तुम्हाला हे पॅकेज बुक करायचे असल्यास, तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट www.irctc.co.in वर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता. याशिवाय ८२८७९३२२२७ या क्रमांकावर संपर्क करूनही याविषयी अधिकची माहिती मिळवता येईल.

WhatsApp channel