Valentine Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी पार्टनरसोबत प्लॅन करा ट्रीप, बेस्ट आहेत ही ठिकाणं-best places to visit with your partner for romantic valentine celebration ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Valentine Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी पार्टनरसोबत प्लॅन करा ट्रीप, बेस्ट आहेत ही ठिकाणं

Valentine Day: रोमँटिक व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी पार्टनरसोबत प्लॅन करा ट्रीप, बेस्ट आहेत ही ठिकाणं

Feb 07, 2024 09:24 AM IST

Travel With Partner: जर तुम्ही व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तुमच्या पार्टनरसोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ठिकाणी ट्रीप प्लॅन करू शकता.

व्हॅलेंटाईन डेला पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी ठिकाणं
व्हॅलेंटाईन डेला पार्टनरसोबत फिरायला जाण्यासाठी ठिकाणं (unsplash)

Places to Visit on Valentine's Day: फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. या महिन्यात प्रत्येकजण आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करतो. फेब्रुवारी महिन्यात ७ ते १४ फेब्रुवारी हे दिवस कपल्ससाठी खूप खास असतात. या दरम्यान व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. या काळात विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. ज्यामध्ये कपल्स एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. या काळात तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर येथे पहा रोमँटिक व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी ५ सर्वोत्तम ठिकाणे. तुम्ही या ठिकाणी रोमँटिक ट्रीप एन्जॉय करू शकता.

उटी

नेत्रदीपक दृश्ये आणि टेकड्यांचे नेत्रदीपक सौंदर्यामुळे उटी हे व्हॅलेंटाईन डे वर कपल्ससाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. या शांत हिल स्टेशनवर थंड वाऱ्याचा आनंद घ्या. उटीमध्ये टॉय ट्रेनचा प्रवास करा. उटीला जाण्यासाठी मेट्टुपालयम येथून ट्रेनने जाता येते. ही ट्रेन तुम्हाला टेकड्यांवरील वळणदार खिंडीतून घेऊन जाते.

आग्रा

रोमँटिक ठिकाणांच्या यादीत आग्राचा समावेश होतो. आग्रा हे व्हॅलेंटाईन डेला भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे कँडल लाइट डिनरचा आनंद घ्या आणि ताजमहालला फोटो क्लिक करा. तुम्ही रोड किंवा रेल्वेमार्गे आगऱ्याला जाऊ शकता. इथे जाण्याआधी बुकिंग करून ठेवावे. कारण व्हॅलेंटाइन डेला खूप गर्दी असते.

शिमला

शिमला हे केवळ सर्वाधिक भेट दिलेल्या हनिमून ठिकाणांपैकी एक नाही तर ते भारतातील सर्वात रोमँटिक शहर देखील आहे. तुमच्या पार्टनरसोबत आईस-स्केटिंग, शॉपिंग, रोमँटिक डिनरचा आनंद घेऊ शकता. तुम्ही दिल्लीवरून गाडीने सहज शिमल्यात पोहोचू शकता. तसेच तुम्ही दिल्लीहून व्होल्वो बुक करू शकता.

मसुरी

हिल्सची राणी म्हणून प्रसिद्ध असलेले मसुरी हे तुमच्या पार्टनरसोबत भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त मसुरीच्या सुंदर दऱ्यांना भेट द्या. येथील सुंदर पर्वत, तलाव, धबधबे आणि रोमँटिक दृश्ये तुमची सहल संस्मरणीय बनवू शकतात. येथे तुम्ही केम्पटी फॉल्स, गन हिल्स, भट्ट फॉल्स आणि लाल टिब्बा सारखी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. तुम्ही दिल्लीहून मसुरीला ट्रेनने जाऊ शकता. यासाठी तुम्ही डेहराडून स्टेशनवर उतरून बस किंवा कॅबने जाऊ शकता.

लॅन्सडाउन

उत्तराखंडमधील लॅन्सडाउन हे एक जबरदस्त आणि रोमँटिक हिल स्टेशन आहे. हे ठिकाण कपल्समध्ये खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही उंच पर्वत, सुंदर दृश्ये आणि तलाव आणि धबधब्यांमध्ये रोमँटिक व्हॅलेंटाईन साजरे करू शकता. येथे भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणे आहेत. येथे रेल्वेने जाण्यासाठी कोटद्वार रेल्वे स्टेशन सर्वात जवळ आहे. तुम्ही येथून टॅक्सी घेऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner