Best Places To Visit in July: जुलै महिना प्रवासासाठी योग्य असतो, विशेषत: ज्यांना पाऊस आवडतो. पावसाळा सुरू झाला आहे. पावसानंतर लोकांना ऊन, उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर येथे आम्ही अशा ठिकाणांबद्दल सांगत आहोत जिथे जुलै महिन्यात हवामान आल्हाददायक असतं. या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासोबत फिरायला जायचे प्लॅन करू शकता.
हिमाचल प्रदेशात आरामदायक वेळ घालवण्यासाठी डलहौसीला भेट द्या. जुलै महिन्यात डलहौसीमध्ये हलकं ऊन असू शकतं, तर संध्याकाळ सौम्य असते. डलहौसी मध्ये फिरण्यासाठी खज्जियार, पंचपुला, सच पास, दैनकुंड शिखर, चमेरा तलाव, सातधारा धबधबा, बारा पाथर, बक्रोटा हिल्स, तिबेटी बाजार, गंजी हिल, रॉक गार्डन, चंबा टाऊन, कलाटॉप वन्यजीव अभयारण्य आहे. डलहौसीमध्ये जुलैमध्ये सरासरी तापमान ११ ते २३ अंश सेल्सिअस असते आणि अधूनमधून पाऊस पडतो.
हे उत्तराखंड मधील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे जे जुलैमध्ये फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. जुलै महिन्यात येथील हवामान पाहण्यासारखे असते. हे पावसाळ्यात सर्वात हिरवेगार असते आणि उन्हाळा आणि हिवाळ्याच्या हंगामापेक्षा कमी गर्दी असते. त्यामुळे जुलैमध्ये हे भारतातील सर्वात शांत ठिकाणांपैकी एक आहे. मसूरीमध्ये लाल टिब्बा, गन हिल पॉईंट, क्लो धबधबा, झरीपाणी धबधबा, कंपनी गार्डन आणि क्लाऊड्स एंड पाहण्यासारखे आहेत. जुलै महिन्यात येथील तापमान दिवसा २३ अंश सेल्सिअस आणि रात्री १५ अंश सेल्सिअस असते.
जुलै हा असा महिना आहे जेव्हा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सर्वात सुंदर दिसते. कारण ते हिरवाईने वेढलेले आहे आणि परदेशी फुले दिसतात. या फुलांमध्ये सॅक्सिफ्रेज, रानटी गुलाब, जेरेनियम, निळा कोरिडालिस यांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे ते एकदम फ्रेश दिसतात. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्कला भेट देण्याबरोबरच हेमकुंड साहिब आणि पुष्पावती नदीचा परिसर एक्सप्लोअर करा.
हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे सात तलाव आढळतात, त्यापैकी नैनीताल तलाव हे या सुंदर हिल स्टेशनचे हृदय आहे. असे म्हटले जाते की सतीचा एक डोळा येथे पडला, ज्यामुळे तलाव तयार झाला. नैनीतालमध्ये फिरण्यासाठी नैनीताल लेक, टिफिन टॉप, हाय अल्टिट्यूड प्राणीसंग्रहालय, इको केव्ह गार्डन, भीमताल तलाव, किलबरी पक्षी अभयारण्य, राजभवन- गव्हर्नर हाऊस यांचा समावेश आहे.
धर्मशाळेला 'लिटिल ल्हासा ऑफ इंडिया' म्हणतात. बर्फाच्छादित पर्वत, घनदाट पाइन जंगल आणि भव्य दऱ्यांनी ते आपल्याला मंत्रमुग्ध करेल. जुलै मध्ये भारतात फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. कडक उन्हापासून वाचण्यासाठी या ठिकाणी जाता येते. धर्मशाळेतील प्रेक्षणीय स्थळांमध्ये त्रियुंड हिल, धर्मशाला क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉन इन वाइल्डरनेस चर्च, वॉर मेमोरियल, गुटो मठ, डल लेक, चहाचे मळे, त्सुगलग खांग, भागसू धबधबा, कांगडा व्हॅली, धरमकोट यांचा समावेश आहे. जुलैमध्ये हलका पाऊस पडतो आणि तापमान २० अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या