मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Christmas Shopping: ख्रिसमसच्या शॉपिंगसाठी मुंबईत 'ही' आहेत ५ बेस्ट मार्केट

Christmas Shopping: ख्रिसमसच्या शॉपिंगसाठी मुंबईत 'ही' आहेत ५ बेस्ट मार्केट

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2022 02:46 PM IST

Best Markets in Mumbai: ख्रिसमसचं सेलिब्रेशनसाठी करण्यासाठी शॉपिंग करायची असेल तर मुंबईतील या ५ महत्त्वाच्या आणि फेमस मार्केट्सला भेट द्या.

मुंबईतील फेमस मार्केट्स
मुंबईतील फेमस मार्केट्स (Freepik )

ख्रिसमसचा सण जवळ आला आहे. आता सण साजरा करायचा म्हंटल्यावर त्याची तयारी तर करायलाच हवी. यासाठी शॉपिंग करावी लागेल. मुंबईत बर्फ, थंडी जाणवत नाही. पण तारांच्या दिव्यांनी सजलेल्या खिडकीतून बघत बघत हॉट चॉकलेट पिणे, ख्रिसमस ट्री आणून त्याला डेकोरेट करणे, पार्टी ठेवणे हे तर आपण मुंबईत नक्कीच करू शकतो. यासाठी तुम्हाला बेल्स, दागिने आणि कँडी केन्सची खरेदी करावी लागले. यासाठीच मुंबईतील ५ महत्त्वाची आणि फेमस मार्केट्स बद्दल सांगत आहोत. जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता.

हिल रोड मार्केट, बांद्रा

इथले रस्ते वर्षभर कपडे, शूज आणि स्ट्रीट फूड विकणारी दुकाने आणि स्टॉल्सने खचाखच भरलेले असताना, ख्रिसमस जसजसा जवळ येतो तसतसे चित्र बदलते. एलईडी तारांमध्ये गुंडाळलेले ट्री दिसू लागतात. यासोबतच बेल्स, विंड चाइम, चमकदार सजावटीचे बॉल्स असं सगळं सामान इथे मिळतं. जर तुम्हाला काही खाण्याचे पदार्थ घेयचे असतील तर स्वादिष्ट प्लम केक आणि ऍपल पाईसाठी A1, Hearsch आणि American Express Bakery ला भेट द्या.

माउंट मेरी स्टेप्स, बांद्रा

सुंदर माउंट मेरी चर्च वर्षाच्या या वेळी अजूनच सुंदर वाटते. चर्चच्या बाहेर वेगवेगळ्या आकाराच्या आणि डिझाईनच्या मेणबत्त्या उपलब्ध असतात. याशिवाय दागिने, लॉकेट, कंदील, दागिने आणि ख्रिसमस स्टॉकिंग्ज विकणारे स्टॉल तिकडे आहेत.

क्रॉफर्ड मार्केट, फोर्ट

मुंबईतील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक म्हणजे क्रॉफर्ड मार्केट. डिसेंबरच्या सुरुवातीला हे मार्केट रंग आणि दिव्यांनी उजळून निघते. बाजाराच्या शेवटच्या , रस्त्यावर भव्य ख्रिसमस सजावट असलेले स्टॉल आहेत. डेकोर आयटम्सपासून ते सांता सूटपर्यंत, तुम्हाला येथे दुर्मिळ आणि सर्वात अनोखे दागिने मिळू शकतात.

ओर्लेम, मालाड

मालाडमधील ख्रिसमससाठी खरेदी करण्यासाठी ओर्लेम हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. लहान समुदाय सणासुदीच्या दिव्यांनी रस्त्यावर उजळतो आणि रस्त्याच्या कडेला ख्रिसमस क्रिब्स उभारलेला दिसतो. स्टॉल्स आणि स्टोअर्स गुडी, फुले आणि डेकोरेशनच समान विकतात.

आयसी कॉलनी, बोरिवली

मुंबईतील आयसी कॉलनी इथले उजळलेले रस्ते उत्सवाचा मूड तयार करतात. इथले नॉव्हेल्टी स्टोअर्स तारेच्या आकाराचे फुगे, मिनी ख्रिसमस ट्री, हार आणि चकचकीत ट्रीट पाऊचने सजलेले असतात. अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च या नावाने हा परिसर दुपारनंतर भटकंती करणाऱ्या भाविकांनी गजबजून जातो.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग