Lemon And Coconut Oil For Dandruff: हिवाळ्यात फक्त केस कोरडे होत नाही तर कोड्यांची समस्या सुद्धा वाढायला लागते. डँड्रफ ही एक सामान्य समस्या आहे जी थंडीच्या दिवसात लोकांना त्रास देऊ शकते. आजकाल प्रदूषणामुळे किंवा केसांची योग्य काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन हेअर स्टाईल्स आणि हेअर प्रोडक्ट्समुळे सुद्धा कोंड्याची समस्या उद्भवू शकते. या समस्येचे कारण काहीही असो पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. जाणून घ्या कोंडा कमी करण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय कसा करावा.
केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय शोधत असाल तर लिंबू आणि खोबरेल तेलाचा वापर करा. लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. तर खोबरेल तेल केसांना आणि टाळूला मॉइश्चराइझ करण्यास मदत करते आणि केसांमधील कोंड्यामुळे होणारी कोरडेपणाची समस्या कमी करण्यास मदत करते. या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा आणि स्काल्पवर लावा.
हा मास्क टाळूवर कमीत कमी ३० मिनिटे लावा आणि चांगले झाकून ठेवा. नंतर सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा. लक्षात ठेवा की हा मास्क कलर केलेल्या केसांवर लावू नका आणि उन्हात बाहेर जाऊ नका. हा लिंबू मास्क लावल्यानंतर घराबाहेर न पडण्याचा प्रयत्न करा.
तुमच्याकडे वेळ कमी असल्यास डेड स्किन आणि पांढरे थर काढून टाकण्यासाठी तुमचे केस आणि टाळू पूर्णपणे स्वच्छ करा. केस धुण्यासाठी तुम्ही कटेकोनाझोल, सेलेनियम सल्फाइड किंवा झिंक असलेले शॅम्पू वापरू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)