मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care: केसांचे सौंदर्य दुप्पट करतील हे ३ उपाय, अनेक समस्या होतील दूर

Hair Care: केसांचे सौंदर्य दुप्पट करतील हे ३ उपाय, अनेक समस्या होतील दूर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 09, 2024 09:55 AM IST

Home Remedies: केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही विविध गोष्टी करत असाल. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी मानले जातात. या ३ उपायांनी तुम्हाला सुंदर केस मिळतील.

केसांसाठी घरगुती उपाय
केसांसाठी घरगुती उपाय (unsplash)

Best Remedies for Hair Care: त्वचेप्रमाणेच केसांची सुद्धा बरीच काळजी घ्यावी लागते. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी, त्यांना स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट मिळतात. शॅम्पू आणि कंडिशनर हे तर नियमित वापरले जाते. पण यामध्ये असलेले रसायने केसांची मुळे कमकुवत करू शकतात. यामुळे केस गळणे, कोंडा, केस ड्राय होणे अशा अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. या समस्या सोडवण्यासाठी आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. असेच ३ बेस्ट उपाय येथे जाणून घ्या.

जवसाचे जेल कसे बनवावे

जर तुम्हाला केसांसाठी घरी फ्लेक्स सीड जेल बनवायचे असेल तर अर्धा कप फ्लेक्स सीड म्हणजे जवसाच्या बिया घ्या. त्यात २ कप पाणी आणि १-२ टेबलस्पून लिंबाचा रस मिक्स करा. आता एका भांड्यात पाणी आणि फ्लेक्स सीड्स घट्ट होईपर्यंत उकळा. त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. जेव्हा ते घट्ट जेलसारखे दिसू लागते तेव्हा गॅस बंद करा. जेल सारखी कंसिस्टंसी येईपर्यंत थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर वापरण्यासाठी हे जेल एका कंटेनरमध्ये भरून ठेवा. हे जवसाचे हेअर जेल रोज सकाळी केसांना लावा.

मध लावा

मध केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी मध आणि पाणी समप्रमाणात घेऊन एका भांड्यात टाका आणि मिक्स करा. आता हे मिश्रण केसांना लावा. २० ते ३० मिनिटे केसांवर राहू द्या. नंतर केस सामान्य पाण्याने धुवा. यामुळे स्प्लिट एंड्स, फ्रिजी केसांची समस्या दूर होईल.

 

एलोवेरा जेल

त्वचा आणि केस दोन्हीसाठी एलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी थोडेसे एलोवेरा जेल हातात घ्या आणि केसांना पूर्णपणे लावा. केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत हे नीट लावून घ्या. साधारण २० ते २५ मिनिटे हे केसांवर राहू द्या. नंतर पाण्याने धुवा. केस मऊ, चमकदार आणि मजबूत करण्यासाठी आठवड्यातून एकदा वापरा. एलोवेरा जेलने केसांच्या अनेक समस्या दूर होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग