Shopping Tips: आठवड्याच्या 'या' दिवशी करा ऑनलाइन शॉपिंग, मिळेल प्रचंड डिस्काउंट!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shopping Tips: आठवड्याच्या 'या' दिवशी करा ऑनलाइन शॉपिंग, मिळेल प्रचंड डिस्काउंट!

Shopping Tips: आठवड्याच्या 'या' दिवशी करा ऑनलाइन शॉपिंग, मिळेल प्रचंड डिस्काउंट!

Published Jul 20, 2024 11:22 PM IST

Online Shopping Tips: आजकाल प्रत्येक जण ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देतो. विविध व्हेरायटीसोबतच येथे भरघोस डिस्काउंट देखील मिळतात. आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगशी संबंधित काही टिप्स सांगणार आहोत.

ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी टिप्स
ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी टिप्स (unsplash)

Best Day for Online Shopping: तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर कुठे ना कुठे आपला ठसा उमटवला आहे. आता आपल्या शॉपिंग हॅबिटचाच विचार केला तर दुकानांमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा आजकाल लोक घरबसल्या फोनच्या माध्यमातून खरेदी करणे पसंत करतात. ऑनलाइन स्टोअर्सवर लहानातल्या लहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत. ना बाजारात जाण्याचं टेन्शन ना दुकानदाराशी बार्गेनिंगचा त्रास. ऑनलाइन शॉपिंगचा एक फायदा म्हणजे वेळोवेळी चांगल्या ऑफर्सही मिळतात. अनेकदा तुम्हाला ब्रँडेड वस्तूही अगदी स्वस्तात मिळतात. पण या ऑफर्सचा स्वतःचा वेळ असतो. तर आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगसाठी कोणती वेळ उत्तम आहे आणि कोणती वेळ टाळावी हे सांगणार आहोत.

आठवड्याची सुरुवात असते चांगली

ऑनलाइन शॉपिंगसाठी सर्वोत्तम काळ आठवड्याच्या सुरुवातीला आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवारी ऑनलाइन शॉपिंग करणे बचतीच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. या दिवसांमध्ये ऑनलाइन शॉपवरील ट्रॅफिक थोडी कमी असते. त्यामुळे ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता थोडी वाढते. किंबहुना आठवड्याच्या सुरुवातीला लोकांकडे ऑफिसची कामे जास्त असतात. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शॉपिंग करण्याची संधी मिळत नाही आणि त्यामुळे या दिवशी ऑनलाइन शॉपवरील ट्रॅफिक खूपच कमी असते.

वीकेंडला ऑनलाइन शॉपिंग टाळा

वीकेंडला म्हणजे शनिवार, रविवारी ऑनलाइन स्टोअरवर सर्वाधिक ट्रॅफिक पाहायला मिळते. या दिवशी ऑनलाइन शॉपिंग टाळली पाहिजे. जास्त ट्रॅफिकमुळे डिस्काउंट आणि ऑफर्स जवळजवळ नसतात. यासोबतच वीकेंडला ऑनलाइन शॉपिंग केल्याने काही वेळा एखाद्या प्रॉडक्टची दुप्पट किंमत मोजावी लागते. वीकेंडला प्रॉडक्ट आउट ऑफ स्टॉक असण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे वीकेंडला ऑनलाइन शॉपिंग करणे टाळावे.

फेस्टिवल सीझनमध्ये करा मोठ्या वस्तूची खरेदी

घरासाठी एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येणाऱ्या कोणत्याही जवळच्या सणाची वाट पहा. खरं तर सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगमध्ये अनेक ऑफर्स येतात. प्रत्येक वेबसाईटवर मोठ्या ऑफर्स आणि डील्स येतात. कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवर मोठी सूट दिली जाते. त्यामुळे मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाइन खरेदी ही फेस्टिवल सीझनमध्येच करण्याचा प्रयत्न करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner