मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Year in Goa: गोव्याच्या या बीचवर जबदरस्त असते नव्या वर्षाचे सेलिब्रेशन, असते वेगळी मजा

New Year in Goa: गोव्याच्या या बीचवर जबदरस्त असते नव्या वर्षाचे सेलिब्रेशन, असते वेगळी मजा

Dec 30, 2023 11:02 PM IST

New Year Celebration in Goa: अनेक लोकांना गोवामध्ये ख्रिसमसप्रमाणेच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करायला सुद्धा आवडते. गोवाच्या या बीचवर नवीन वर्षाचे सेलिब्रेशनची एक वेगळीत मजा असते.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठी गोव्यातील बीच
नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठी गोव्यातील बीच (unsplash)

Beaches of Goa For New Year Celebration: गोवा म्हणजे पार्टी, सेलिब्रेशनचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे नवीन वर्षाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आणि त्यामुळे ते खूप चैतन्यमय बनते. नवीन वर्षात गोव्यातील नाइटलाइफ परदेशी ठिकाणांना टक्कर देते. त्यामुळेच नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बहुतांश लोक गोव्यात पोहोचतात. तुम्हीही नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्याला जात असाल तर या बीचेसला नक्की भेट द्या. येथील पार्टी खास असतात. गोवाच्या या बीचवर होणाऱ्या सेलिब्रेशन पार्टी कशा असतात जाणून घ्या.

नवीन वर्षासाठी गोव्यात कुठे जावे

कलंगुट बीच

कलंगुट बीच गोव्यातील सर्वात व्यस्त बीचपैकी एक आहे आणि न्यु इयर इव्ह साजरी करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. अनेक रेस्टॉरंट्स आणि बार नवीन वर्षाच्या चांगल्या पार्ट्या असतात. तुम्ही येथे लाइव्ह म्युझिक, फटाक्यांची आतिषबाजी आणि बीच फेस्टिव्हलचा आनंद घेऊ शकता.

ट्रेंडिंग न्यूज

बागा बीच

बागा बीच हे गोव्यातील नवीन वर्ष साजरे करण्याचे आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक बीच रेस्टॉरंट्स आणि नाइट क्लबमध्ये म्युझिक, डान्स आणि फटाक्यांच्या आतिषबाजींसह नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित केली जातात.

पालोलेम बीच

नवीन वर्षासोबत रात्रभर पार्टी करण्यासाठी हे गोव्यातील बेस्ट ठिकाण आहे. ताऱ्यांच्या लखलखाटासह येथे फटाक्यांची आतिषबाजी पाहू शकता. हे एक संस्मरणीय आणि भावनिक अनुभव बनेल.

अंजुना बीच

अंजुना बीच हे गोव्यातील नवीन वर्षाच्या उत्सवासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे अनेक बीच पार्टी आयोजित केल्या जातात आणि तुम्ही लाइव्ह म्युझिक आणि फटाक्यांच्या आतिषबाजीचा आनंद घेऊ शकता.

 

कँडोलिम बीच

कँडोलिम बीच हे गोव्यातील न्यु इयर इव्ह साजरी करण्यासाठी एक शांत ठिकाण आहे. अनेक बीच रिसॉर्ट्स नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला संगीत आणि डान्स पार्टी देतात आणि तुम्ही मध्यरात्री बीचवर फिरण्याचा आनंद देखील घेऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel