Besan Ladoo Recipe: बेसन लाडू टाळूला चिकटतो, बेसनाचा कच्चा वास येतो? या सोप्या पद्धतीने बनवा खमंग लाडू-besan ladoo recipe make khamang ladoo in this easy way see recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Besan Ladoo Recipe: बेसन लाडू टाळूला चिकटतो, बेसनाचा कच्चा वास येतो? या सोप्या पद्धतीने बनवा खमंग लाडू

Besan Ladoo Recipe: बेसन लाडू टाळूला चिकटतो, बेसनाचा कच्चा वास येतो? या सोप्या पद्धतीने बनवा खमंग लाडू

Sep 17, 2024 10:30 AM IST

How to make Besan Ladoo: काही महिलांना बेसनाचे लाडू बनवताना विविध अडचणी येतात. काहींना बेसन नीट न भाजल्यामुळे लाडूत कच्च्या बेसनाचा वास येतो.

Besan Ladoo Recipe
Besan Ladoo Recipe (freepik)

Besan Ladoo Recipe:  बेसन लाडू हा भारतीय घरात बनवला जाणारा पारंपारिक गोड पदार्थ आहे. आईने बनवलेल्या बेसनाच्या लाडूची चव इतर कोणत्याही गोड पदार्थात येत नाही. देशी तुपात भाजलेल्या बेसनाचा खमंग सुगंध क्वचितच कुणाला आवडत नसेल. कोणत्याही उत्सवात बेसनाच्या लाडूला विशेष महत्त्व असते. खासकरून दिवाळीत हा लाडू आवर्जून बनवला जातो. परंतु दिवाळीशिवायही अनेक लोक बेसनाचे लाडू बनवतात. परंतु काही महिलांना बेसनाचे लाडू बनवताना विविध अडचणी येतात. काहींना बेसन नीट न भाजल्यामुळे लाडूत कच्च्या बेसनाचा वास येतो. तर काहींचे लाडू टाळूला चिकटतात.

तुमच्यासोबतची या गोष्टी घडत असतील. तर आता चिंता करण्याची गरज नाही आज आम्ही तुम्हाला बेसनाच्या लाडूची एक सोपी आणि खमंग रेसिपी सांगणार आहोत. बेसनाचे लाडू चविष्ट होण्यासाठी ते बनल्यानंतर ते जास्त कडक होऊ नयेत आणि बेसनही चांगले भाजलेले पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे. आमची रेसिपी फॉलो करून तुम्ही सहज चविष्ट बेसन लाडू तयार करू शकाल.

 

बेसन लाडू बनवण्यासाठी साहित्य-

-बेसन - २ वाट्या

-तूप - १ कप

-पिठीसाखर - १ कप

-काजू – १० (चिरून)

- बदाम - १०

-पिस्ता - १ टीस्पून

-वेलची पावडर -१ टीस्पून

बेसनाचे लाडू बनवण्याची पद्धत-

बेसनाचे लाडू बनवण्यासाठी सर्व सर्वप्रथम एक जाड तळाची कढई घ्या. आणि त्यात तूप घालून मंद आचेवर गरम होऊ द्या. तूप गरम होऊन वितळल्यावर त्यात बेसन घालून मिक्स करा. यानंतर बेसन ढवळत असताना मंद आचेवर साधारण १२-१३ मिनिटे भाजून घ्या. बेसनाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत आणि त्यातून एक तुपाचा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यावे लागते. त्यामुळे लाडू बनवल्यानंतर बेसनाचा कच्चा वास येत नाही.

आता काजू आणि बदाम घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. नंतर बेसनमध्ये चिरलेले काजू आणि बदाम घालून चांगले मिक्स करावे. यानंतर बेसनावर थोडे पाणी शिंपडून भाजून घ्या. यामुळे बेसन दाणेदार होण्यास मदत होईल. शिवाय लाडू टाळूला अजिबात चिकटणार नाही. आता बेसनावरचे पाणी आटेपर्यंत भाजून घ्या. यानंतर गॅस बंद करा. आता एक मोठी प्लेट घ्या आणि त्यात बेसनचे मिश्रण काढा.

बेसन थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. बेसनाचे मिश्रण थोडं कोमट झालं की, त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड टाकून बेसन मिक्स करून घ्या. दोन्ही हातांनी मिश्रण चांगले मिसळा. साखर आणि बेसन नीट एकजीव झाल्यावर बेसनाचे मिश्रण दोन्ही हातात घेऊन दाबून लाडू बांधायला सुरुवात करा. तयार लाडू एका ट्रे किंवा प्लेटमध्ये वेगळे ठेवा आणि हलके दाबून त्यावर पिस्त्याचे काप चिकटवा. अशा प्रकारे तुमचे स्वादिष्ट बेसन लाडू तयार आहेत.

 

Whats_app_banner
विभाग