Benefits of Soybean: निरोगी राहण्यासाठी शरीरात जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे असणे अत्यंत आवश्यक आहे. यातील कोणत्याही घटकाच्या कमतरतेमुळे शरीराला विविध आजार होऊ लागतात. त्यामुळे लोक अनेक महागड्या औषधांचे आणि कृत्रिम प्रोटीनचे सेवन करतात. परंतु असे करणे आरोग्यासाठी घातक आहे.त्यामुळे आपण काही निरोगी आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करू शकता. सोयाबीन यापैकीच एक पर्याय आहे.
सोयाबीनचे सेवन केल्याने शरीरातील जवळपास सर्व आवश्यक घटकांची पूर्तता होते. सर्वसामान्यपणे असे म्हटले जाते की अंडी आणि चिकनपेक्षासुद्धा सोयाबीनमध्ये जास्त पॉवर असते. सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि कार्ब्ससह अनेक पोषक घटक असतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज आपण सोयाबीनचे फायदे जाणून घेणार आहोत.
शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळण्यासाठी सोयाबीन हा एक उत्तम पर्याय असू शकतो. सोयाबीनमध्ये सर्व आवश्यक अमीनो ॲसिड असतात. हे अमीनो ॲसिड तुमच्या स्नायू आणि हाडांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी सोयाबीन अधिक प्रभावी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच सोयाबीन हा लोहाचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, सोयाबीनच्या प्रत्येकी एका कपमध्ये सुमारे ९ मिलीग्राम लोह असते. लोह रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते.
तुम्ही तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. काही हेल्थ रिपोर्ट्सनुसार, सोयाबीनमध्ये शरीरातील एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल ४ ते ६ टक्के कमी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सोयाबीन वजन घटवण्यातदेखील उपयुक्त आहे.
आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास हृदय निरोगी राहते. तसेच, हृदयातील रक्तप्रवाह सुधारते. हृदयाची सूज कमी होऊ शकते. परंतु सर्वांनीच त्याचे सेवन करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रिपोर्ट्सनुसार, सोयाबीन हा फायबरचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. एक कप सोयाबीनमध्ये सुमारे १० ग्रॅम फायबर असते. त्यामुळेच सोयाबीनचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी ठेवता येते.