
जीवन हे पूर्णपणे अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं. आपण प्रत्येक प्रॉब्लेम टाळू शकत नाही, पण त्यासाठी तयार राहणं आपल्या हातात आहे. अचानक येणारी मेडिकल एमर्जन्सी किंवा दीर्घकाळ चालणारा आजार कधी कधी पूर्ण बचत संपवू शकतो आणि संपूर्ण फॅमिली आर्थिक अडचणीत येते. अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स एक स्ट्रॉंग सपोर्ट बनतो. मोठ्या मेडिकल बिल्सचा ताण तुमच्यावर न येता विमा कंपनी तो उचलते, ज्यामुळे उपचार मिळण्यात अडथळा येत नाही.
हेल्थ इन्शुरन्स तुमच्या सेव्हिंग्ज वाचवतं. चला आरोग्य विम्याचे सर्व फायदे जाणून घेऊया.
हेल्थ इन्शुरन्सचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे महागड्या सर्जरी आणि हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा खर्च तुमच्या खिशातून न जाता इन्शुरन्स कंपनीकडून भरला जातो. पण याव्यतिरिक्तही अनेक फायदे आहेत, जे खूप उपयुक्त ठरतात. Acko Insurance सारख्या अनेक विमा कंपन्या असे फायदे देतात. चला, हे सगळे फायदे एकेक करून समजून घेऊया:
काही उपचार खूप मोठे नसतील पण तुम्हाला २४ तासांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागू शकते. बेड चार्जेस, डॉक्टरांची फी, ऑपरेशन थिएटर, नर्सिंग, औषधे, ICU याचा सर्व खर्च विमा कंपनी भरते.
जेव्हा तुम्हाला कोणत्याही आजाराचे निदान होते तेव्हा डॉक्टर तुम्हाला अनेक चाचण्या, चेक अप, एक्स-रे, स्कॅन करण्यास सांगतात. आणि डिस्चार्जनंतर ३०-६० दिवसांच्या आत डॉक्टरांचे फॉलोअप, औषधे, फिजिओथेरपी आवश्यक असते. हे सर्व खर्च विम्यामध्ये समाविष्ट आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा खर्चही काही मर्यादेत विमा कंपनीकडून भरला जातो. एम्बुलेंसची आवश्यकता असते. जर तुम्हाला त्याची जास्त गरज असेल तर तो एक मोठा खर्च बनतो. इन्शुरन्स कंपनी ॲम्ब्युलन्सचा खर्च भरते. वेगवेगळ्या पॉलिसींमध्ये ते बदलू शकते.
आजकाल बऱ्याच उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये २४ तास थांबण्याची गरज राहत नाही. मोतीबिंदू (कॅटरॅक्ट सर्जरी), केमोथेरपी, डायलिसिस, यांसारख्या ट्रीटमेंट्ससाठी २४ तास हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता नसते. अशा ट्रीटमेंट्सचा समावेश डे-केअर ट्रीटमेंट्समध्ये केला जातो आणि त्यांचा खर्च पूर्णपणे इन्शुरन्स कंपनीकडून कव्हर केला जातो.
दर दोन वर्षांनी एकदा हेल्थ चेकअप करणं चांगलं असतं. यामुळे शरीरात काही प्रॉब्लेम सुरू होण्याआधीच तो लक्षात येतो आणि वेळेत ट्रीटमेंट घेता येते. आणि जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला, तर तुम्हाला हेच चेकअप फ्रीमध्ये मिळू शकतात. काही विमा कंपन्या ही सुविधा देतात. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेतल्यास फक्त हॉस्पिटलचा खर्च नाही, तर हेल्थ चेकअपसारखे फायदेही मिळतात.
हा निरोगी राहण्याचा एक फायदा आहे. अनेकांना वाटतं की इन्शुरन्स पॉलिसी घेणे म्हणजे पैशांचा अनावश्यक खर्च आहे आणि ते त्यांची पॉलिसी बंद करतात. पण महत्त्वाचं हे आहे की, जर तुम्ही एका वर्षात एकही क्लेम केला नाही, तर पुढच्या वर्षी तुमचं इन्शुरन्स कव्हरेज वाढतं किंवा तुम्हाला रिन्यूअल प्रीमियमवर डिस्काउंट मिळतो. याचा अर्थ तुम्ही पैसे वाचवता आणि सोबतच प्रोटेक्शनही मिळवता.
पूर्वी फक्त काही ठराविक हॉस्पिटल्समध्येच कॅशलेस ट्रीटमेंटची सुविधा होती. पण आता, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झाला, तर तुमच्या हातात कॅश असणं आवश्यक नाही. तुमचे हॉस्पिटल बिल पूर्णपणे इन्शुरन्स कंपनीकडून कव्हर केले जाते आणि तुमचं लक्ष फक्त ट्रीटमेंटवर राहू शकतं.
काही ठराविक ट्रीटमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीही करता येतात. अशावेळीही तुमचं हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला मदत करतो, कारण ही देखील एक प्रकारची ट्रीटमेंट मानली जाते. यासाठी काही अटी असतात. पण तरीसुद्धा ही एक महत्त्वाची सुविधा आहे.
फक्त ॲलोपॅथीच नाही, तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट्सचा समावेश देखील हेल्थ इन्शुरन्समध्ये केला जातो. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तुमची ट्रीटमेंट बदलू शकता. जर तुम्हाला आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी किंवा सिद्ध अशा पर्यायी पद्धतींनी ट्रीटमेंट घ्यायची असेल, तरीही हेल्थ इन्शुरन्स कंपन्या तो खर्च कव्हर करतात.
गर्भधारणा हा आजार नसला तरी, तिच्याशी संबंधित खर्च हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर केला जातो. यामध्ये गर्भधारणा, बाळंतपण आणि प्रसूतीनंतरची काळजी (Postnatal Care) जसे की नियमित चेक-अप्स आणि अल्ट्रासाऊंड्सचा समावेश असतो. इन्शुरन्स पॉलिसी केवळ बाळंतपणाचा खर्चच नाही तर बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यांपर्यंत होणाऱ्या तपासण्या, लसीकरण आणि डॉक्टरांच्या भेटी याचाही खर्च कव्हर करतात. काही पॉलिसीजमध्ये गर्भधारणे संबंधित गुंतागुंतही कव्हर केली जाते. त्यामुळे जे कपल्स फॅमिली प्लॅन करत आहेत त्यांनी मॅटरनिटी कव्हरसह आरोग्य पॉलिसी काढावी.
जरी तुमची ट्रीटमेंट, औषधं आणि अॅम्ब्युलन्स वगैरेचा खर्च पॉलिसीमध्ये कव्हर केले गेले असले तरी, हॉस्पिटलमध्ये असताना ट्रान्सपोर्टेशन, जेवण, पार्किंग, किंवा इतर छोट्या गोष्टींसारखे काही नॉन-मेडिकल एक्स्पेन्सेस येतातच. अशा खर्चांसाठी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला कॅश देऊन मदत करते. हे बेनिफिट प्रत्येक पॉलिसीनुसार वेगवेगळे असू शकते.
हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला केवळ मेडिकल खर्चापासून वाचवत नाही, तर तुम्हाला टॅक्समध्येही सूट मिळते. तुम्ही जे प्रीमियम भरता, त्यावर आयकर विभागानुसार (Income Tax Act च्या 80D कलमानुसार) सूट मिळते.
या सर्व फायद्यांव्यतिरिक्त, इतरही अनेक बेनिफिट्स आहेत जे प्रत्येक पॉलिसीनुसार बदलतात. परंतु यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही मोठ्या खर्चातून वाचता, तुमची बचत सुरक्षित राहते आणि तुमचे जीवन अडचणीशिवाय पुढे जाते. आजच्या जगात, आर्थिक स्थिरता हे जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ आहे, विशेषतः जेव्हा आजारपणांची संख्या वाढत आहे आणि खर्चही प्रचंड आहे.
म्हणूनच, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी हेल्थ इन्शुरन्सने संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा केवळ एक खर्च नसून, तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षित भविष्यासाठी केलेली एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे.
संबंधित बातम्या
