Almond Milk Benefits: बदाम घालून दूध सकाळी प्यावे की रात्री? काय आहेत शरीराला फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Almond Milk Benefits: बदाम घालून दूध सकाळी प्यावे की रात्री? काय आहेत शरीराला फायदे

Almond Milk Benefits: बदाम घालून दूध सकाळी प्यावे की रात्री? काय आहेत शरीराला फायदे

Aarti Vilas Borade HT Marathi
Published May 25, 2024 11:32 AM IST

Almond Milk Benefits: अनेकदा डॉक्टर बदाम घालून दूध पिण्याचा सल्ला देतात. पण हे दूध रात्री प्यावे की दिवसा असा प्रश्न मात्र, सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया...

Almond Milk: बदाम घालून दूध पिण्याचे फायदे
Almond Milk: बदाम घालून दूध पिण्याचे फायदे

दूध हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे डॉक्टर दररोज दूध प्यावे असे सांगत असतात. शरीरासाठी लागणारे सर्व पोषक घटक हे दूधात असतात. त्यामुळे दूध पिणे गरजेचे असते. पण तुम्हाला माहित आहे का की दुधात जर तुम्ही बदाम मिसळून प्यायले तर तुमच्या आरोग्याला दुहेरी फायदे होतात. पण हे दूध दिवसातून कधी प्यावे असा प्रश्न सर्वांना पडतो. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बदाम दूध प्यावे असे अनेकांना वाटत असते. पण नेमकं कधी प्यावे चला जाणून घेऊया...

दूध पिण्याचे फायदे

दुधात कॅल्शियम, प्रथिने आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात. त्याच बरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे कमकुवत हाडे मजबूत ठेवण्यासाठी दररोज दूध पिणे गरजेचे असते. तसेच बदामात मोठ्या प्रमाणावर पोषक घटक असतात. त्यामुळे दूध आणि बदाम एकत्र पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
वाचा: विचार करून मेंदू थकला असेल तर अशा प्रकारे करा त्याला रिलॅक्स, माइंड होईल क्लिअर

काय आहे बदाम दूध पिण्याचे फायदे?

बदाम आणि दूधाचे एकत्र सेवन करणे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई तुमच्या निस्तेज त्वचेला आणि निर्जीव केसांना जीवदान देतात. बदाम दूधाने त्वचेवर एक वेगळी चमक येते. तसेच केसांची वाढ होते. त्यामुळे बदाम दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. बदामाच्या दुधाचे सेवन हाडांच्या रुग्णांसाठी अमृतापेक्षा कमी नाही. बहुतांश महिलांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असते. अशा स्थितीत त्यांनी बदाम आणि दूध अवश्य सेवन करावे.
वाचा: शिकंजी बनवण्याची ही पद्धत नवीन आहे, माधुरी दीक्षितच्या पतीने शेअर केली रेसिपी

बदाम दूधाचे केव्हा करावे सेवन?

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर कधीही बदामाचे दूध घेऊ शकता. एका ग्लास गरम दुधात ३-४ बदामांची पूड करुन टाका. रात्री झोपण्यापूर्वी ते पिऊन झोपा. बदाम रात्रभर भिजत ठेवा. त्याची साल काढून दुधात बारीक करून टाका आणि नाश्तानंतर पिऊन घ्या. हे दूध प्यायल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील.
वाचा: चेहऱ्यावर डार्क पॅचेस आणि ड्रायनेस दिसत असेल तर ट्राय करा हे उपाय, होईल फायदा

एका दिवसात किती दूध प्यावे?

तुम्ही दिवसभरात आरामात २ ते ३ कप दूध पिऊ शकता, परंतु लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असू शकतो. जर तुम्ही फुल क्रीम दूध पीत असाल तर एक किंवा दोन कपपेक्षा जास्त पिऊ नका, अन्यथा वजन वाढू शकते.

Whats_app_banner