मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Benefits of eating Bay leaf: तमालपत्र खाण्याचे फायदे

Benefits of eating Bay leaf: तमालपत्र खाण्याचे फायदे

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jan 22, 2024 08:09 PM IST

Benefits of eating Bay leaf - तमालपत्र केवळ अन्नात चव वाढवत नाही तर यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स सुद्धा असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Bay leaf has been in use since ancient times in traditional and folk medicines.
Bay leaf has been in use since ancient times in traditional and folk medicines.

तमालपत्र म्हणजे भारतीय पाककृतींमधील एक लोकप्रिय चवदार घटक आहे. पचनाचे विकार बरे करण्यासाठी, रक्तात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी प्राचीन काळापासून तमालपत्राचा जेवणार वापर केला जातोय. वेगळ्या चवीमुळे प्रत्येक किचनमध्ये मसाल्याच्या पदार्थात आजही तमालपत्र आपली लोकप्रियता टिकवून आहे. आज जगभरात विविध पाककृतींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तमालपत्रामुळे करीची चव आणि सुगंध वाढते तसेच तांदळामध्ये कोरडे तमालपत्र ठेवल्याने त्याला वेगळा अॅरोमा येतो. ताजी तमालपत्र कडू आणि कडक असल्याने तमालपत्रे वापरण्यापूर्वी वाळविली जातात. तमालपत्र हे लहान सदाहरित झाडापासून मिळते. यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. तमालपत्राचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. श्वसनविकार, संसर्ग, पचनाच्या समस्या, अतिसार, लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून तमालपत्र गुणकारी असते. 

पोटदुखी, फुफ्फुसातील कफ साफ करणे, सर्दी आणि घशात खवखव कमी करण्यास तमालपत्र खाल्ल्याने मदत होते. शिवाय संधिवात आणि न्यूरॉलॉजीवरील उपचारांमध्ये देखील प्रभावी असतं. तमालपत्र नाकपुडीत किंवा डोक्याच्या पट्ट्याखाली ठेवल्यास डोकेदुखीवर उपचार होतो, असं मानलं जातं.  

तमालपत्रात संरक्षक शक्ती असल्याचे प्राचीन काळात मानलं जायचं. त्यामुळे ते समृद्धी, कीर्ती आणि विजयाचे प्रतीक मानले जायचे. पूर्वी लोक घरावर वीज पडू नये म्हणून तमालपत्राचे झाड घराजवळ लावत असत.

Ancient Mediterraneans  believed the tree could protect them from misfortune and used to plant it near their homes to prevent lightning strikes.
Ancient Mediterraneans believed the tree could protect them from misfortune and used to plant it near their homes to prevent lightning strikes.

डोक्याखाली तमालपत्र ठेवून झोपल्यास माणूस कवी बनू शकतो, असा रोमन आणि ग्रीक लोकांचा विश्वास होता. तमालपत्र वाईट गोष्टी दूर करण्यास मदत करू शकते असा चिनी लोकांचा विश्वास होता. 

Before cooking rice or other grain meals, add a few bay leaves. The essence of the bay leaves permeates the grains and gives your dinner a pleasant backdrop.
Before cooking rice or other grain meals, add a few bay leaves. The essence of the bay leaves permeates the grains and gives your dinner a pleasant backdrop.

आहारात तमालपत्राचा वापर कसा करावा

 

न्यूट्रिशनिस्ट अपूर्व अग्रवाल यांनी सांगितलेले तमालपत्राचे सेवन करण्याचे वेगवेगळे प्रकार

. तांदूळ किंवा इतर धान्य शिजवण्यापूर्वी त्यात थोडी तमालपत्रे घाला. तमालपत्राचे सार धान्यात उतरून जेवणाला एक वेगळी चव प्राप्त होते.

. जेवणासाठी मसाला तयार करताना इतर मसाल्यांच्या पदार्थांसोबत चिरलेले तमालपत्र घालावे. ग्रिल करण्यापूर्वी मसाल्याचे हे मिश्रण मांस किंवा भाज्यांवर शिंपडावे. यामुळे अन्न पदार्थाला एक अद्भुत अशी हर्बल चव येते.

. हर्बल चहा तयार करण्यासाठी वाळलेल्या तमालपत्राचा वापर करावा. गरम पाण्यात तमालपत्राची काही पाने थोडा वेळ भिजवल्यास त्यात एक आल्हाददायक सुगंध येतो.

तमालपत्राचे सेवन कोणी करू नये?

बहुतांश स्वयंपाकाच्या पदार्थात तमालपत्र वापरू शकता. मात्र ज्यांना तमालपत्राची अॅलर्जी आहे, त्यांनी खाणे टाळावे, असं अग्रवाल सांगतात.

WhatsApp channel