मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  गार पाण्यानं अंघोळ करण्याचे आहेत प्रचंड फायदे, या रोगांपासून होईल सुटका

गार पाण्यानं अंघोळ करण्याचे आहेत प्रचंड फायदे, या रोगांपासून होईल सुटका

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 20, 2022 09:37 AM IST

काही लोकांना अंघोळीसाठी नेहमी गरम पाणी लागतं तर अनेकजणांना गार पाण्यानं अंघोळ करायची सवय असते, परंतु दररोज गार पाण्यानं अंघोळ केल्यामुळं त्याचे आरोग्याला अनेक गुणकारी फायदे असतात.

Benefits Of Bathing In Cold Water
Benefits Of Bathing In Cold Water (HT)

Health Tips : अनेक लोकांना अंघोळ केल्यानंतर थकवा जातो आणि शरीर व मन फ्रेश झाल्यासारखं वाटतं. अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात ही अंघोळीपासून करत असतात. त्यामुळं शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. याशिवाय दररोज चांगल्या पद्धतीनं अंघोळ केल्यास त्यामुळं शरीर निरोगी आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते. परंतु तुम्हाला माहितीये का, गरम पाण्यानं अंघोळ करण्यापेक्षा गार पाण्यानं अंघोळ करणं हे आरोग्यदायी आणि फायदेशीर मानलं असतं. चला तर गार पाण्यानं अंघोळ करण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

अनेक लोकांना बदलत्या जीवनशैलीमुळं आणि सततच्या कामाच्या ताणामुळं तणावाचा सामना करावा लागतो. याशिवाय असंतुलित आहारामुळं आणि तणावामुळं अनेकजण लठ्ठपणाच्या आहारी जात असतात. त्यासाठी अनेकजण हे व्यायाम करण्याचा किंवा डाएटिंगचा पर्याय निवडतात, परंतु तज्ज्ञांनी दिलेल्या सल्लानुसार तुम्ही गार पाण्यानं अंघोळ करुन वाढलेलं अतिरिक्त वजन कमी करू शकता.

काय आहेत आरोग्यदायी फायदे?

आपल्या शरीरात व्हाईट फॅट आणि ब्राऊन फॅटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. परंतु शरीराला व्हाईट फॅटची काहीही आवश्यकता नसते तर ब्राऊन फॅट शरीरासाठी चांगलं असतं. जेव्हा तुम्ही गार पाण्यानं अंघोळ करता त्या वेळेस शरीरातील फॅट आपोआप वितळायला लागतं, परिणामी तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळं शरिरातील फॅटचं प्रमाण आणि समतोल राखण्यासाठी गार पाण्यानं अंघोळ करायला हवी. दररोज गार पाण्यानं अंघोळ केल्यास त्यामुळं शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

याशिवाय यामुळं रक्ताभिसरण वाढून व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळं व्यक्तीच्या शरीराला विविध आजारांशी लढण्यास फायदा होतो. याशिवाय अनेक लोकांना सततच्या कामामुळं किंवा कौटुंबिक कलहामुळं तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत असतो. त्यामुळं हे टेन्शन रिलीज करण्यासाठी गार पाण्यानं अंघोळ करायला हवी.

गार पाण्यानं सतत अंघोळ केल्यास तुमची बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते. त्याचबरोबर सध्या वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळं त्याचा विपरित परिणाम हा केसांवर आणि त्वचेवर होत आहे. त्यामुळं केस आणि त्वचेच्या विकारांवर मात करण्यासाठी गार पाण्यानं अंघोळ करणं फायदेशीर ठरतं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या