Benefits of Amla for Kids: अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेला आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. आवळा शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतो. हे जेवढे मोठ्यांसाठी फायद्याचे आहे तेवढेच लहान मुलांसाठीही फायदेशीर आहे. मोठे लोक तर नियमित आवळा खातात. पण मुलांना आवळा खाऊ घालणे खूप आव्हानात्मक असते. मुलांच्या वाढत्या वयात आवळ्याचा आहारात समावेश केल्यास त्यांना खूप फायदा होतो. मुलांना आवळा खायला दिल्याने काय फायदे होतात आणि ते मुलांना कसे खायला द्यावे हे जाणून घ्या.
हिवाळ्यात लोक आवळा भरपूर खातात. या ऋतूत मुलांनाही हे खाऊ घालावे. हे मुलांना संसर्गापासून वाचवते. आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. मुलांना आजारांपासून दूर ठेवण्याचा हा देशी उपाय आहे. मुलांसाठी आवळा कसा फायदेशीर आहे
- पोट साफ करण्यासाठी उपयुक्त
- अँटी बॅक्टेरियल गुण
- रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
- रक्तातील लोह वाढवते.
- मेंदूच्या पेशींचे पोषण करते. ज्यामुळे स्मरणशक्ती वाढते.
- मुलांची भूक वाढवते.
हिवाळ्यात मुलांच्या आहारात आवळा समाविष्ट करा. तुम्ही बाळाला सुका आवळा, लोणचे किंवा मुरब्बा खायला देऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मुलांसाठी आवळा कँडी घरीही बनवू शकता. मुलांना हे नक्कीच आवडेल. याशिवाय आवळा चटणी आणि सरबतही मुलांना देता येईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या