मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ajwain : उन्हाळ्यात ओवा खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; या आजारांसाठी गुणकारी
Benefits of Ajwain
Benefits of Ajwain (HT)

Ajwain : उन्हाळ्यात ओवा खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; या आजारांसाठी गुणकारी

14 May 2022, 9:02 ISTAtik Sikandar Shaikh

उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळं अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. परंतु या काळात ओव्याचं सेवन केल्यास त्यामुळं व्यक्तीच्या आरोग्याला त्याचा फायदा होत असतो.

Benefits of Ajwain : अनेक भारतीय घरांमध्ये ओवा वापरलं जातं. काही लोक हे फक्त हिवाळ्यातच ओव्याचं सेवन करत असतात. परंतु हिवाळ्याशिवाय उन्हाळ्यातही ओव्याचा वापर केल्यास तो आरोग्याला फायदेशीर ठरण्याची शक्यता असते. फक्त ते करत असताना हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात ओव्याचा वापर कमी करायला हवा.

ट्रेंडिंग न्यूज

उन्हाळ्यात ओवा खाण्याचे काय आहेत फायदे?

उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते. कारण वाढलेल्या अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं असे अन्नपदार्थ खाल्ल्यास पोटांचे विकार आणि पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळं मळमळ आणि डिहाड्रेशनची समस्या संभवते. याशिवाय ज्या लोकांना पोटात जंतूचा त्रास आहे, अशा लोकांसाठीही ओव्याचं सेवन करणं फायदेशीर असतं.

काय आहे ओवा वापरण्याची पद्धत?

उन्हाळ्यात औषधाच्या स्वरुपात ओव्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. याशिवाय ओव्याला भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. उन्हाळ्यात अन्नपदार्थ खाल्ल्यानं पोटांचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळं उन्हाळ्यात ओव्याचं पाण्यासोबत सेवन केल्यास त्यामुळं अन्नपचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर काही संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी किंवा शरीराचं फिटनेस राखण्यासाठी ओव्याचं सेवन करायला हवं.

या काळात घरासमोरील कुंडीच लावलेल्या ओव्याचंही तुम्ही सेवन करू शकता. याशिवाय जेवण केल्यानंतर चिमूटभर ओव्याला पाण्यात मिसळून प्यायला हवं. त्यामुळं अन्नपचनक्रिया आणि पोटांचे विकार नाहीसे होण्यास मदत होते.

कोशिंबीरमध्येही करता येणार वापर...

ओवा वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे ओवा आणि जिऱ्याचं समान प्रमाणात भाजून घ्यायला हवं. यासाठी ओवा आणि जिरे तेल न वापरता त्याला चुलीवर हलक्या पद्धतीनं भाजून घ्यायला हवं. त्यात थोडी दही मिसळली तर त्यामुळं या पदार्थाची चवही वाढण्यास मदत होते आणि पचनशक्तीही वाढते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)