Marriage Tips: आयुष्यात लग्न ही फार महत्त्वाची गोष्ट असते. हा निर्णय चुकला तर आयुष्यभर पच्छाताप होऊ शकतो. तुम्ही लव्ह मॅरेज करत असाल किंवा मग अरेंज मॅरेज काही गोष्टी लग्नाच्या आधी क्लिअर झालेल्या बऱ्या असतात. भावी जोडीदाराला काही प्रश्न विचारून त्यांच्या उत्तराबद्दल आवश्य जाणून घ्या. हे तुम्हाला लग्नाविषयी योग्य तो निर्णय घेण्यास मदत करेल. चला जाणून घेऊयात कोणते प्रश्न लग्न करण्याआधी विचारणे गरजेचे आहे.
बरेच लोक त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतात. अशा परिस्थितीत, लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी, आपल्या भावी जोडीदाराशी याबद्दल बोला. या दरम्यान, त्यांच्या व्यवसायाशी संबंधित प्रश्न विचारा आणि आपल्या करिअरची उद्दिष्टे देखील सांगा. त्यामुळे लग्नानंतरच्या जोडीदाराच्या कामामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्य चांगल्या पद्धतीने सांभाळू शकाल.
लग्नापूर्वी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती एकमेकांशी शेअर केलीत तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होऊ शकते. खरे तर लग्नानंतर अनेक वेळा जोडप्यांमध्ये पैशांवरून भांडणे होतात. म्हणूनच लग्नापूर्वी जोडीदाराशी स्वतःबद्दल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते.
लग्नानंतर अनेक वेळा नोकरी आणि कुटुंबाबाबत नोकरी करणाऱ्या जोडप्यांमध्ये मतभेद होतात. ही समस्या टाळण्यासाठी लग्नाआधी पार्टनरशी बोलून सर्व काही क्लिअर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन लग्न झाल्यानंतर नोकरी करत असताना तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील.
लग्नाआधी तुमच्या जोडीदाराशी कुटुंब नियोजनाबद्दलही बोला. तसेच प्रत्येक गोष्टीवर परस्पर सहमती झाल्यानंतरच संबंध पुढे नेण्याचा विचार करा. वास्तविक अनेक जोडप्यांना लग्नानंतर कुटुंब नियोजन आवडते तर काहींना नाही. अशा परिस्थितीत, लग्नानंतर जर तुमचे विचार याविषयी पूर्ण झाले नाहीत, तर तुम्हाला तणाव फेस करावा लागेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या