मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Eating Tips: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का ठेवला जातो? जाणून घ्या जबरदस्त फायदे

Mango Eating Tips: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का ठेवला जातो? जाणून घ्या जबरदस्त फायदे

Aarti Vilas Borade HT Marathi
May 08, 2024 04:28 PM IST

Mango Eating Tips: सध्या आंब्यांचा सिझन आहे. अनेकजण आवडीने आंबे खाताना दिसतात. पण आंबे खाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायला हवी? चला जाणून घेऊया...

Mango Eating Tips: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का ठेवला जातो? जाणून घ्या जबरदस्त फायदे
Mango Eating Tips: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का ठेवला जातो? जाणून घ्या जबरदस्त फायदे (unsplash)

आंबा हे फळ जवळपास सर्वांच्या आवडीचे आहे. फळांचा राजा म्हणून ओळख असलेले हे फळ वर्षातून एकदाच बाजारात उपलब्ध असते. या फळाची जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वजण आंबे आनंदाने व आवडीने खाताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का आंबे खाण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. अनेकजण आंबे पाण्यात ठेवतात. पण किती वेळ हा आंबा पाण्यात ठेवावा असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया त्याविषयी...

ट्रेंडिंग न्यूज

आयुर्वेद एक्सपोर्टने दिली आंबा खाताना घेण्याची काळजी

अनेकजण कोणतीही काळजी न घेताच आंबा खाताना दिसतात. पण आंबा तसाच खाणे हे शरीरासाठी योग्य नाही. आयुर्वेद एक्सपोर्ट दीक्षा भावसार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबा खाण्यापूर्वी कोणती काळजी घेणे गरजेचे असते हे सांगितले आहे. आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवणे गरजेचे आहे. त्याचा शरीराला मोठा फायदा होते अशी माहिती आयुर्वेद एक्सपर्टने दिली आहे.
वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

किती वेळ आंबा पाण्यात ठेवावा

आंबा खाण्यापूर्वी जवळपास १ ते २ तास पाण्यात भिजत ठेवायला हवा. जर तुमच्याकडे त्यापेक्षाही कमी वेळ असेल तर केवळ २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजत ठेवावा. खाण्यापूर्वी आंबा पाण्यात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामागे काय कारण आहे? हे देखील जाणून घेऊया...
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

आंबा पाण्यात का भिजत ठेवावा?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, आंबा पाण्यात भिजवल्याने त्यातील अतिरिक्त फायटिक ॲसिड कमी होतेृ. हे एक प्रकारचे शरीर विरोधी पोषक आहे. हे शरीरातील काही खनिजे जसे की लोह, जस्त, कॅल्शियम आणि इतर खनिजे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते. ज्यामुळे शरीरात खनिजांची कमतरता भासू लागते.
वाचा: मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

आंबा भिजवण्याचे फायदे

आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजत घातल्याने अनेक फायदे होताता. त्वचेशी संबंधीत समस्या, डोकेदुखी, आतड्यांशी संबंधीत विकार आणि बद्धकोष्ठता सारखे आजार कमी होतात. तसेच आंबा खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आंबा खाण्याचे इतरही काही फायदे आहेत.

WhatsApp channel

विभाग