Mental Health Care Tips: आजकालच्या काळात निद्रानाश म्हणजे झोप न लागणे, झोप न येणे हा कॉमन आजार झाला आहे. अनेक गोष्टी झोपण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणतात. कोविड काळात आणि त्यानंतरही निद्रानाशाच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोक दररोज रात्री ८ तासांची निट झोपही घेत नाहीत. जेव्हा चांगल्या झोपेचा विचार केला जातो तेव्हा तज्ञ झोपेच्या योग्य पद्धतीबद्दल बोलतात. झोपेच्या वेळी निरोगी सवयीचा अवलंब करणे गरजेचे आहे. ज्यामुळे एखाद्याला रात्री चांगली झोप येण्यास मदत होते. दरवर्षी याबाबदल जागृतता करण्यासाठी जागतिक झोपेचा दिवस १५ मार्च रोजी साजरा केला जातो.
आपण कसे झोपता याचा आपल्या मानसिक आरोग्यावर खोल वर परिणाम होऊ शकतो. अलीकडील संशोधनात आपल्या जोडीदारासह बेड शेअर करणे चांगल्या मानसिक आरोग्याशी जोडले गेले आहे. तर एकटे झोपणे चांगले आहे कारण यामुळे अखंड विश्रांती घेण्यास मदतही होते.
अॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या आणि अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जोडीदारासोबत बेड शेअर करणारे प्रौढ लोक एकटे झोपणाऱ्यांपेक्षा चांगले झोपतात. अभ्यासानुसार, जोडीदारासोबत बेड शेअर केल्याने कधीही जोडीदारासोबत बेड शेअर न करणाऱ्यांपेक्षा कमी तीव्र निद्रानाश, कमी थकवा आणि जास्त वेळ झोप येते. या अभ्यासानुसार, आपल्या जोडीदारासोबत झोपणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी आश्चर्यकारक कार्य करू शकते. याचे कारण सोबत झोपलेल्या पार्टनरला कमी नैराश्य, चिंता आणि तणाव आणि नातेसंबंधांबद्दल अधिक समाधान नोंदवले गेले आहे.
परंतु काही तज्ञांच्या मते, बेड शेअर केल्याने लोकांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. जोडीदाराचे घोरणे किंवा नीट न झोपणे यामुळे त्रास होऊ शकतो.
न्यूयॉर्क टाइम्सने २०२३ मध्ये २,२०० अमेरिकन प्रौढांवर केलेल्या सर्वेक्षणानुसार, झोपेच्या घटस्फोटाचा एक नवीन ट्रेंड लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे आणि अधिकाधिक जोडपी आता आठवड्यातून बहुतेक दिवस स्वतंत्र बेडरूममध्ये झोपत आहेत. जर एका जोडीदाराला झोपेची समस्या जाणवत असेल आणि परिणामी फिरणे आणि वळणे यामुळे दुसऱ्या जोडीदाराच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. एकांत झोपेमुळे पार्टनरला एसी तापमान, पंख्याचा वेग किंवा गादीची दृढता यावर भांडणे टाळण्यास मदत होते.
'स्लीप डिवोर्स'मुळे झोपेची गुणवत्ता सुधारू शकते, पण रात्रीच्या वेळी वेगळे राहिल्याने संवाद आणि जिव्हाळ्यावर परिणाम झाल्यास नातेसंबंधांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे बेड शेअर करणे आणि एकटे झोपणे यातील वाद दीर्घकाळ चाललेला आहे. त्यामुळे यावर उत्तर म्हणजे निव्वळ आपल्या पसंतीनुसार पर्याय निवडावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)