Lipstick Shades: लिपस्टिकच्या या ट्रेंडिंग शेड्स वाढवतील चेहऱ्याचे सौंदर्य, याशिवाय अपूर्ण आहे तुमचा मेकअप-beauty tips try these trending lipstick shades to complete your makeup ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lipstick Shades: लिपस्टिकच्या या ट्रेंडिंग शेड्स वाढवतील चेहऱ्याचे सौंदर्य, याशिवाय अपूर्ण आहे तुमचा मेकअप

Lipstick Shades: लिपस्टिकच्या या ट्रेंडिंग शेड्स वाढवतील चेहऱ्याचे सौंदर्य, याशिवाय अपूर्ण आहे तुमचा मेकअप

Sep 22, 2024 06:35 PM IST

Beauty Tips: एक चांगली लिपस्टिक शेड आपल्या लुकला कंप्लीट करून आपल्या सौंदर्यात भर घालू शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा काही लिपस्टिक शेड्सबद्दल ज्यामुळे तुमचे ओठ सुंदर तर होतीलच पण तुम्ही यंग सुद्धा दिसाल.

Beauty Tips: ट्रेंडिंग लिपस्टिक शेड्स
Beauty Tips: ट्रेंडिंग लिपस्टिक शेड्स (pexels)

Trending Lipsticks Shades: स्त्रीच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यात किंवा बिघडविण्यात वेगवेगळ्या रंगाच्या लिपस्टिक शेड्सचा मोठा हात असतो. अशा वेळी प्रत्येक महिलेने आपल्यासाठी लिपस्टिक शेड्स निवडताना लेटेस्ट ट्रेंडसोबत आपल्या स्किन टोन आणि वयाची विशेष काळजी घेतली पाहिजे. एक चांगली लिपस्टिक शेड आपल्या लुकला कंप्लीट करते आणि आपले सौंदर्य आणखी खुलवू शकते. चला तर मग अशा काही लिपस्टिक शेड्सबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे फक्त तुमचे ओठ सुंदर दिसणार नाही तर तुम्ही यंग सुद्धा दिसाल.

न्यूड शेड्स

जर तुमच्या त्वचेचा रंग लाइट असेल किंवा तुम्ही थोडेसे अंडरटोन असाल तर तुम्ही वॉर्म न्यूड शेड्सची लिपस्टिक लावावी. न्यूड शेड्स केवळ आपल्या ओठांना नैसर्गिक लुक देत नाहीत तर प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट असतात. आपल्या स्किन टोननुसार अशा शेड्स तुम्हाला आवडू शकतात. न्यूड शेड्सची विशेषता म्हणजे त्यांना लावून तुम्ही तुमच्या वयापेक्षा ५ वर्षांनी लहान दिसू शकता.

पीच कलर

पीच कलरची लिपस्टिक शेड प्रत्येक स्किन टोनवर चांगली दिसते. हे तुमच्या चेहऱ्याला फ्रेश लूक देऊन त्या व्यक्तीला तुमच्या नेमक्या वयाचा अंदाज येऊ देत नाही. कॉलेजला जाणाऱ्या मुलींपासून ते ऑफिसला जाणाऱ्या महिलांपर्यंत ही शेड लावायला प्रत्येकीला आवडते. डार्क स्किन टोनसाठी तुम्ही लाइट पिंक, लव्हेंडर कलर किंवा पर्पल रंग निवडू शकता. याशिवाय तुमच्यावर भरपूर खुलतील.

कॉपर ब्राऊन

हा सर्व वयोगटातील महिलांचा आवडता रंग आहे. हा रंग फार डार्क किंवा फार लाइट नसतो. तो कोणत्याही खास आणि सामान्य प्रसंगी कॅरी केला जाऊ शकतो.

डीप रेड

डीप रेड रंग अतिशय आकर्षक दिसतात. गव्हाळी रंगाच्या त्वचेसाठी हा कलर सर्वोत्तम लिपस्टिक शेडपैकी एक आहे. हा रंग तुमचे ओठ सुंदर तर बनवतोच, शिवाय तुमचा लूक बोल्ड आणि आकर्षक बनवून वयही कमी करतो.

लिपस्टिक लावताना करू नका या चुका

- मॅट लिपस्टिकचा वापर कमीत कमी करा. अशा लिपस्टिकमुळे तुमचे ओठ कोरडे आणि फ्लॅट दिसू लागतात.

- ब्राइट आणि बोल्ड लिपस्टिक शेड्समुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा वयाने मोठे दिसू शकता. अशावेळी स्वत:साठी नेहमीच नॅचरल लिपस्टिक शेड्स निवडा.

- ओठांवर लावण्यासाठी फक्त ब्रँडेड लिपस्टिक शेड्सचा वापर करा. त्यांच्या चांगल्या गुणवत्तेबरोबरच ते ओठांवरही बराच काळ टिकून राहतात. ते लावल्याने मेकअपला एक कंप्लीट टच मिळतो.

- ओठांना नियमित मॉइश्चरायझ करा, जेणेकरून ते कोरडे आणि फाटलेले राहणार नाहीत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग