मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips: फक्त काही घरगुती उपाय आणि काळे ओठ होतील नॅचरली पिंक

Beauty Tips: फक्त काही घरगुती उपाय आणि काळे ओठ होतील नॅचरली पिंक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jun 03, 2023 05:11 PM IST

Lips Care Tips: गुलाबी ओठ प्रत्येकाला हवे असतात. पण अनेक वेळा ते काळे पडू लागतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि गुलाबी ओठ मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय ट्राय करू शकता. जाणून घ्या.

गुलाबी ओठांसाठी घरगुती उपाय
गुलाबी ओठांसाठी घरगुती उपाय

Home Remedies for Naturally Pink Lips: तुमच्या सौंदर्याला आणखी खुलवण्याचे काम गुलाबी ओठ करतात. विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने किंवा ओठांची योग्य काळजी न घेतल्याने अनेकदा ओठ काळे दिसायला लागतात. तसेच हवामानातील बदलामुळे, आपले ओठ कोरडे दिसू लागतात आणि त्याच वेळी त्यांची चमक देखील हरवली जाते. जर तुम्हीही ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल आणि त्यांची चमक परत हवी असेल तर हे घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयोगी पडतील. ज्याच्या मदतीने तुम्ही ओठांची चमक परत आणू शकता आणि त्यांना गुलाबी ठेवू शकता.

गुलाब जल आणि लिंबू, ग्लिसरीन

रात्री झोपण्यापूर्वी कापसावर गुलाब जल घेऊन हलक्या हाताने ओठांवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. याशिवाय गुलाब जलमध्ये लिंबू आणि ग्लिसरीन टाकूनही लावता येते.

नारळाचे तेल

गुलाब जलने डेड स्किन साफ केल्यानंतर तुम्ही लिपबाम ऐवजी खोबरेल तेलाने ओठांना हलके मालिश करू शकता.

काकडी

काकडीचा रस काढून थंड होण्यासाठी ठेवा, काही वेळाने ओठांवर लावा. यामुळे थंडावाही मिळेल आणि ओठांची चमकही परत येईल.

साखर आणि लोणी

साखर बारीक करून त्यात बटर मिक्स करा. हे ओठांवर लावून हलक्या हातांनी मसाज करा. आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करा. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.

दूध आणि हळद

एक चमचा दूध घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण ओठांवर लावा आणि साधारण १५ ते २० मिनीटांनी पाण्याने धुवा.

गुलाबाच्या पाकळ्या

साधारण ८ ते १० गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या चांगल्या बारीक करा. आता त्यामध्ये थोडे कच्चे दूध मिक्स करा. हे मिश्रण रोज झोपण्यापूर्वी लावा.

दुखाची साय

ओठांची चमक परत आणण्यासाठी आणि त्यांना गुलाबी ठेवण्यासाठी दुधाची साय किंवा क्रीम हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी चमच्याने दुधातून साय काढून घ्या. ओठांना हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळ असेच राहू द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग