Beauty Tips: त्वचा आणि केसांसाठी वरदान आहे भिजवलेल्या तांदळाचे पाणी, एकदा ट्राय कराच!-beauty tips soaked rice water is beneficial for skin and hair ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips: त्वचा आणि केसांसाठी वरदान आहे भिजवलेल्या तांदळाचे पाणी, एकदा ट्राय कराच!

Beauty Tips: त्वचा आणि केसांसाठी वरदान आहे भिजवलेल्या तांदळाचे पाणी, एकदा ट्राय कराच!

Sep 08, 2024 03:38 PM IST

Skin and Hair Care Tips: तांदूळ शिजवण्यापूर्वी भिजवला जातो. हे पाणी तुम्ही फेकत असाल तर असे अजिबात करू नका. कारण या पाण्यामुळे त्वचा आणि केस दोन्ही सुधारू शकतात.

Skin and Hair Care Tips: त्वचा आणि केसांसाठी तांदूळ भिजवलेले पाणी
Skin and Hair Care Tips: त्वचा आणि केसांसाठी तांदूळ भिजवलेले पाणी (freepik)

Soaked Rice Water for Skin and Hair: बहुतेक घरांमध्ये रोज भात बनवला जातो. ते बनवण्यापूर्वी तांदूळ काही काळ भिजवून ठेवले जातात जेणेकरून ते नीट फुलतील. मात्र ज्या पाण्यात ते भिजवले जाते, ते पाणी अनेकदा फेकून दिले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की हे पाणी त्वचा आणि केस दोन्हीची चमक वाढवू शकते? होय, आजकाल मुलींना ग्लास स्किनचे वेड लागले आहे. या प्रकारची त्वचा मिळविण्यासाठी सर्वात आवश्यक घटक म्हणजे तांदूळ. कोरियन स्किन केअर प्रोडक्टमध्ये तांदळाचे पाणी किंवा तांदळाचे पीठ वापरले जाते. आजकाल ब्युटी एक्स्पर्ट देखील तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचा सल्ला देतात. तांदळाचे पाणी बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा आणि केस दोन्ही सुधारू शकतात. तर मग आता तांदूळ भिजवलेले पाणी फेकू नका, आधी त्याचे फायदे जाणून घ्या.

त्वचा आणि केसांसाठी आहे वरदान

तांदळाचे पाणी त्वचा आणि केस दोन्हीसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्याकडे स्किन आणि हेअर केअरसाठी वेळ नसेल तर तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. तांदूळ भिजवताना त्याचे पाणी वाचवा आणि नंतर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून चेहरा धुवा. हेअर वॉश केल्यानंतर केसांना या पाण्याने धुवा.

फायदेशीर आहे तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम होते. हे जळजळ किंवा सूज देखील कमी करते. हे पाणी त्वचा घट्ट होण्यास, मुरुम कमी करण्यास मदत करते. केसांवर याचा वापर केल्याने ते मजबूत होतात. हे पाणी नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय मानले जाते. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि मिनरल्स आढळतात, जे केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.

कसे बनवावे तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी बनविण्यासाठी तांदूळ घेऊन चांगले धुवावे. नंतर तांदळापेक्षा जास्त पाण्यात ते भिजवावे. उदाहरणार्थ, एक कप तांदळात दोन कप पाणी घाला. थोड्या वेळाने पाणी गाळून घ्या. तांदळाचे पाणी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. वापरताना ते नीट हलवा आणि नंतर वापरा.

सर्वांनासाठी फायदेशीर नाही हे पाणी

काही लोकांना एंजाइम, प्रथिने आणि तांदळाच्या पाण्याच्या इतर घटकांची एलर्जी असू शकते. अशा परिस्थितीत या लोकांना तांदळाच्या पाण्यामुळे चेहऱ्यावर जळजळ, खाज सुटणे, सूज येणे, लालसरपणा किंवा असे दुष्परिणाम होऊ शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner