Facial Massage Tips: चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावण्यासोबतच करा हे काम, त्वचेला होतात अनेक फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Facial Massage Tips: चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावण्यासोबतच करा हे काम, त्वचेला होतात अनेक फायदे

Facial Massage Tips: चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावण्यासोबतच करा हे काम, त्वचेला होतात अनेक फायदे

Published Jul 15, 2024 01:31 PM IST

Beauty Tips in Marathi: जर तुम्हाला चेहऱ्यावर चमक हवी असेल तर फक्त ऑइल, सीरम किंवा मॉइश्चरायझर लावून चालणार नाही. त्यासाठी चेहऱ्यावर चांगली मसाज करावी लागेल. जाणून घ्या फेशियल मसाजचे फायदे.

फेशियल मसाज करण्याचे फायदे
फेशियल मसाज करण्याचे फायदे (unsplash)

Benefits of Facial Massage: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी प्रत्येक जण अनेक गोष्टी करत असतात. फेसवॉश करण्यासोबत प्रत्येक जण चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावतो. पण अजून एक गोष्ट यासोबत केली तर त्वचा चमकू लागेल आणि त्वचेत लवकर सैलपणा येणार नाही. खरं तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्वचेची मसाज करणे खूप महत्वाची असते. फेशियल मसाजमुळे त्वचा चमकदार तर होतेच, शिवाय अनेक फायदेही मिळतात. फेशियल मसाज कसा करावा आणि त्याचे फायदे काय आहेत ते येथे जाणून घ्या.

असे करा फेशियल मसाज

- चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर हातात घ्या आणि नंतर चेहऱ्यावर लावा.

- मग बोटांच्या साहाय्याने गालाच्या आतील भागाबरोबरच कान, भुवयांच्या सभोवतालच्या भागावर मसाज करावा.

- मसाज करताना बोटे आतील बाजूस फिरवा. जेणेकरून त्वचा घट्ट होईल.

- बोटांच्या साहाय्याने डोळ्यांभोवती हलकी थाप द्या आणि हलके फिरवा.

दररोज चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचेला होतात अनेक फायदे

ब्लड सर्कुलेशन वाढते

चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे चेहऱ्यावर चमक दिसू लागते. हलक्या हातांनी चेहऱ्याची मालिश करताना त्वचेत ब्लड फ्लो वाढतो आणि चेहऱ्याच्या त्वचेला आवश्यक ऑक्सिजन मिळतो. पोषण मिळू लागते. ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक वायब्रंट आणि तरुण दिसतो.

त्वचेचा रंग सुधारतो

रक्ताभिसरण वाढले तर त्वचेचा रंगही सुधारेल. फेशियल मसाल त्वचेच्या स्नायूंना उत्तेजित करते आणि त्यांचा व्यायाम होतो. ज्यामुळे बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होतात. ज्यामुळे चेहऱ्याचा रंग चमकदार दिसतो.

त्वचा नीट करते एब्जॉर्ब

जर तुम्ही त्वचेवर बदामाचे तेल लावत असाल किंवा मॉइश्चरायझरच्या मदतीने त्वचेला मॉइश्चराइझ करायचे असेल तर फेशियल मसाज त्वचेला ते नीट शोषून घेण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषणही मिळते. जेव्हा जेव्हा तुम्ही त्वचेवर सीरम, ऑइल किंवा क्रीम लावाल तेव्हा चेहऱ्याचा मसाज करा. यामुळे त्वचेत शोषून घेण्याची शक्यता वाढते.

रिलॅक्स फील होते

अनेकदा दिवसभर टेन्शन आणि कामाचा ताण चेहऱ्याच्या स्नायूंवर भारी पडतो किंवा दिसू लागतो. जेव्हा आपण दररोज फेशियल मसाज करता तेव्हा स्नायूंना रिलॅक्स करण्यास आणि तणावमुक्त होण्यास मदत होते. ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेच्या वयावर होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner