Beauty Tips: वॅक्सिंगसाठी सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! पैसे खर्च न करता घरच्या-घरी मिटेल चिंता
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips: वॅक्सिंगसाठी सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! पैसे खर्च न करता घरच्या-घरी मिटेल चिंता

Beauty Tips: वॅक्सिंगसाठी सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! पैसे खर्च न करता घरच्या-घरी मिटेल चिंता

Aug 01, 2024 11:23 AM IST

How to wax at home: तुम्हाला प्रत्येक वेळी वॅक्स करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण आता घरच्या-घरी तुम्ही हातापायांचे वॅक्स करू शकता. घरच्या घरी वॅक्स केल्याने तुमची त्वचा विविध केमिकल्सपासून वाचते.



घरामध्ये वॅक्सिंग करण्याची पद्धत
घरामध्ये वॅक्सिंग करण्याची पद्धत (Freepik)

How to wax at home: मुलींना, महिलांना नेहमीच आपल्या शरीराची काळजी घ्यायला आवडतं. अनेकजण स्वतःला टापटीप-नीटनेटके ठेवण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. पार्लरमध्ये हजारो रुपये देऊन हातापायांचे वॅक्स केले जाते. परंतु आता तुम्हाला प्रत्येक वेळी वॅक्स करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण आता घरच्या-घरी तुम्ही हातापायांचे वॅक्स करू शकता. घरच्या घरी वॅक्स केल्याने तुमची त्वचा विविध केमिकल्सपासून वाचते. शिवाय वॅक्समुळे काहीही दुष्परिणाम न होता तुमची त्वचा अतिशय मऊ बनते.

आता तुम्हाला हातापायांवर लहान-लहान येणाऱ्या केसांसाठी पार्लरमध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही. तर तुम्हाला स्वयंपाकघरात असलेल्या काही गोष्टी एकत्र करून घ्याव्या लागतील. ३०० रुपयांऐवजी पूर्ण हात आणि पायाचे वॅक्स केवळ ५० रुपयांना मिळेल. तुम्हाला फक्त ही एक गोष्ट खरेदी करावी लागेल. आणि जर घरी उपलब्ध असेल तर तोही खर्च करण्याची अजिबात गरज नाही. अलीकडे अनेक महिला-मुली घरच्याघरी वॅक्सिंग करून आपले पैसे वाचवतात. शिवाय तुमच्या त्वचेला ऍलर्जी होण्याचा धोका कमी होतो.

मध आणण्याची आवश्यकता

घरामध्ये तुम्ही आरामात हातापायांचे वॅक्स करू शकता. घरगुती वॅक्स नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असतात, त्यामुळे ते तुमच्या त्वचेचे पोषण करतात आणि कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अलीकडे अनेक स्त्रिया घरात स्वतः वॅक्स करण्याला प्राधान्य देत आहेत. घरात वॅक्स करण्यासाठी इतर सर्व वस्तू तुमच्या स्वययंपाकघरात आरामात मिळून जातात. फक्त तुम्हाला बाजारातून मधाची बाटली आणण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे अगदी ५० रुपयांच्या आत तुम्हाला मधाची बाटली उपलब्ध होते.

घरामध्ये वॅक्सिंग करण्यासाठी लागणारे साहित्य

साखर - १ कप

लिंबाचा रस - १/४ कप

मध - २ चमचे

पाणी- १ आवश्यकतेनुसार

वॅक्स स्ट्रिप्स- आवश्यकतेनुसार

 

घरामध्ये वॅक्सिंग करण्याची पद्धत

सर्व प्रथम, एक नॉन-स्टिक पॅन घ्या आणि त्यात वर नमूद केलेल्या प्रमाणात साखर, पाणी, मध आणि लिंबाचा रस घाला आणि मंद आचेवर चांगली उकळी येईपर्यंत शिजवा. हे मिश्रण उकळत असताना चमच्याने ढवळत राहा. आणि घट्टसर होईपर्यंत शिजवा. यानंतर, एक काचेचे भांडे किंवा कंटेनर घ्या त्यात हे मिश्रण भरून बर्फाच्या पाण्यात थंड करण्यासाठी ठेवा. आता तुम्ही हे मिश्रण वॅक्सिंग जेलसारखे वापरू शकता.प्रथम तुमच्या हातावर किंवा पायांवर वॅक्स लावा, त्यावर पट्ट्या ठेवा, थोडासा चोळा आणि नंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने ओढा. अशाने तुमच्या त्वचेवरील केस निघण्यास मदत होईल. अशाप्रकारे घरच्या घरी केमिकल्स न वापरता वॅक्स केल्याने तुमच्या त्वचेला कोणतीही हानी होणार नाही. शिवाय यात असलेल्या लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचेचा उजळ आणि संतुलित करते. आणि साखर हे नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जे मृत त्वचेच्या पेशी आणि केस काढून टाकते. त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Whats_app_banner