Beauty Tips: महागड्या क्रीमशिवाय मिळवा गुलाबी आणि नितळ त्वचा! 'या' घरगुती उपायाने चंद्रासारखा चमकेल तुमचा चेहरा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips: महागड्या क्रीमशिवाय मिळवा गुलाबी आणि नितळ त्वचा! 'या' घरगुती उपायाने चंद्रासारखा चमकेल तुमचा चेहरा

Beauty Tips: महागड्या क्रीमशिवाय मिळवा गुलाबी आणि नितळ त्वचा! 'या' घरगुती उपायाने चंद्रासारखा चमकेल तुमचा चेहरा

Jul 26, 2024 03:53 PM IST

Homemade Rose Gel: तुम्हालाही गुलाबी रंगाचा चमकदार चेहरा मिळवायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. हे बनवायला खूप सोपं आहे.

गुलाब जेल वापरण्याचे फायदे
गुलाब जेल वापरण्याचे फायदे (Shutterstock)

Home Beauty Tips: सुंदर दिसायला कुणाला नाही आवडत. विशेषत: प्रत्येक मुलीला टापटीप आणि सुंदर दिसायला आवडतं. रंग गोरा असणे म्हणजे सुंदर अशी संकल्पना आता अजिबात राहिली नाही. रंग कोणताही असो मात्र चेहरा नितळ आणि तजेलदार असला तर ती व्यक्ती जास्त खुलून दिसते. आपला चेहरा नितळ, टवटवीत आणि तजेलदार दिसावा यासाठी मुली अनेक प्रयोग करत असतात. महागड्या क्रीम, ब्युटी ट्रीटमेंट, विविध प्रकारचे फेशियल आणि बरंच काही. 

आता या महागड्या उपायांवर पैसे खर्च करणे हे प्रत्येकालाच परवडत नाही आणि रुचतही नाही. शिवाय ते आपल्या त्वचेसाठीही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अगदी घरच्या घरी गुलाबाच्या फुलांच्या मदतीने एक चमत्कारिक टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुमच्या चेहऱ्याला परफेक्ट पिंक ग्लो मिळेल. विशेष म्हणजे हे बनविणे खूप सोपे आहे आणि फारच कमी वेळेत त्याचा सकारात्मक फरकसुद्धा दिसून येतो.

गुलाब जेल बनवण्याची पद्धत

हे चमत्कारिक गुलाब जेल बनवण्यासाठी तुम्हाला ताज्या गुलाबाच्या पाकळ्या लागतील. जर काही कारणास्तव तुमच्याकडे ताज्या गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या गुलाब पावडरचाही वापर करू शकता. आता तीन ते चार फुलांच्या पाकळ्या थोड्या गुलाबपाण्याने बारीक करून घ्याव्यात. तुम्ही त्यांना चिरून त्यांचा रस काढू शकता. आता चहाच्या गाळणीच्या साहाय्याने गुलाबाचा रस फिल्टर करून घ्या. या रसात थोडा कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्या. अशाप्रकारे तुमचे गुलाब जेल तयार आहे.

गुलाब जेल वापरण्याची पद्धत

वास्तविक तुम्ही हे जेल केव्हाही लावू शकता, परंतु रात्री लावणं अधिक परिणामकारक ठरतं. त्यामुळे रात्री फेस वॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आता रोज थोडे जेल घेऊन अलगदपणे चेहऱ्याला चांगला मसाज करा. हे जेल रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. रात्रभर जेल चेहऱ्यात शोषला जाईल. आणि आपला चेहरा सुधारण्याचे काम करेल. रोज झोपण्यापूर्वी हा उपाय करायला अजिबात विसरू नका. काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावरील डाग नाहीसे होऊ लागतील आणि तुमच्या चेहऱ्यावर गुलाबी चमक येईल. शिवाय चेहरा अगदी खुलून दिसेल.

गुलाब जेल वापरण्याचे फायदे

बहुतांश स्त्रिया किंवा मुली केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने वापरण्याऐवजी घरगुती उपाय करण्यावर भर देतात. अशा महिलांसाठी हा जेल अगदी उत्तम आहे. गुलाब जेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. नैसर्गिक गोष्टींच्या साहाय्याने आपण ते घरीच तयार केले आहे. त्यामुळे ते पूर्णपणे रसायनमुक्त असते. गुलाबामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. जे चेहरा उजळवण्याचे काम करते. यासोबतच त्वचेची उघडलेली छिद्रे म्हणजेच ओपन पोर्स आणि डागांची समस्याही दूर होते. कोरफड आणि व्हिटॅमिन ई देखील चेहऱ्याची पोत सुधारण्याचे काम करतात. काही दिवसांच्या वापरानंतर चेहरा गुलाबासारखा चमकू लागतो.

 

(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner