How to Use Lemon Peel for Pedicure: घाणेरडे, काळे, फाटलेले पाय खूप वाईट दिसतात. चेहरा आणि हातांप्रमाणेच पायांची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे खराब पाय अपमानाचे कारण बनणार नाहीत. तुमचे खराब झालेले पाय स्वच्छ करण्यासाठी आणि पेडिक्योर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी टाकाऊ लिंबाच्या सालीने पेडीक्योर करण्यासाठी स्क्रब बनवता येतो. लिंबाच्या सालीने बनवलेले पेडीक्योर स्क्रब वापरून पाय एकदम चमकदार दिसतील. जाणून घ्या हे कसे बनवावे आणि वापरावे.
- दोन ते तीन लिंबाची साल
- शॅम्पू
- स्क्रब
- एरंडेल तेल
- बेबी ऑइल
- बेकिंग सोडा
सर्वप्रथम एक ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्यात दोन ते तीन लिंबांची साल घालून चांगले उकळावे. आता हे गरम पाणी एका मोठ्या भांड्यात घालून त्यात अधिक थंड पाणी मिसळावे. जेणेकरून त्यात पाय बुडविणे सोपे होईल. आता उकडलेल्या लिंबाच्या सालीवर स्क्रब लावा आणि त्याने पाय स्वच्छ करा. लिंबाच्या सालीने टाच, नखांचे कोपरे चोळून स्वच्छ करा. नंतर पाण्याने धुवून टाका. आता एका बाऊलमध्ये एक चमचा बेबी ऑइल, एक चमचा एरंडेल तेल आणि एक चमचा बेकिंग पावडर मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. ही तयार केलेली पेस्ट पायांवर लावून मसाज करा. यामुळे पायांची टॅनिंग दूर होईल आणि त्वचा मुलायम होईल. टांचाचा रुक्षपणाही संपायला सुरुवात होईल.
जर पायांची त्वचा रुक्ष आणि फाटलेली दिसू लागली असेल तर ती मऊ होण्यासाठी रोज भिजवलेले अक्रोड आणि बदाम खा. यामुळे त्वचेत दिसणारा कोरडेपणा दूर होऊन पायांची त्वचा मुलायम होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)