Homemade Lip Balm: कोरड्या आणि फाटलेल्या ओठांवर लावा नारळापासून बनवलेले लिप बाम, घरी सहज होते तयार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Homemade Lip Balm: कोरड्या आणि फाटलेल्या ओठांवर लावा नारळापासून बनवलेले लिप बाम, घरी सहज होते तयार

Homemade Lip Balm: कोरड्या आणि फाटलेल्या ओठांवर लावा नारळापासून बनवलेले लिप बाम, घरी सहज होते तयार

Jul 17, 2024 07:16 PM IST

Beauty Tips: बदलत्या ऋतूत पाण्याअभावी ओठ कोरडे पडू लागतात आणि क्रॅक होऊ लागतात. जर तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर तुम्ही कोकोनट लिप बाम वापरू शकता. हे घरी सहज तयार करू शकता. कसे ते जाणून घ्या

कोकोनट लिप बाम बनवण्यासाठी टिप्स
कोकोनट लिप बाम बनवण्यासाठी टिप्स

Tips to Make Coconut Lip Balm: पावसाळ्यात ओठ फाटण्याची तक्रार बहुतांश लोकांना असते. खरं तर या ऋतूत त्वचा आणि ओठ खूप कोरडे होतात. ज्यामुळे रोज लिप बाम लावण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात भरपूर प्रकारचे लिप बाम उपलब्ध असले तरी ते सर्व रसायनयुक्त आणि टिंट आहेत. ते लावल्याने ओठांवर एक रंगही दिसतो. काही लोकांना ते आवडत नाही. जर तुमचाही त्या लोकांच्या यादीत समावेश असेल तर तुम्ही स्वत:साठी घरीच लिप बाम बनवू शकता. लिप बाम अनेक प्रकारे कसे बनवायचे ते येथे आहे.

कोकोनट लिप बाम बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- १ चमचा खोबरेल तेल

- १ चमचा पेट्रोलियम जेली

- ५ थेंब जोजोबा ऑइल

कसे बनवायचे कोकोनट लिप बाम

पेट्रोलियम जेली वितळवून घ्या. मग त्यात खोबरेल तेल आणि जोजोबा ऑइल एकत्र मिक्स करा. मिश्रण एका कंटेनरमध्ये भरा आणि साधारण २० ते ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.

कोकोनट लिप बाम बनवण्याची आणखी एक पद्धत

आवश्ययक साहित्य

- १ चमचा खोबरेल तेल

- १ चमचा व्हॅसलीन

- अर्धा चमचा कार्नोबा वॅक्स

- १ चमचा एलोवेरा जेल

हे लिप बाम बनवण्याची पद्धत

एका पॅनमध्ये खोबरेल तेल, व्हॅसलीन आणि कार्नोबा वॅक्स मंद आचेवर वितळवावे. नंतर हे मिश्रण थंड होऊ द्या आणि त्यात एलोवेरा जेल घाला. आता हे मिश्रण एका कंटेनर किंवा छोट्या डबीत टाकून सेट होऊ द्या. आपण लिप बाम स्टिक स्वच्छ करू शकता आणि त्यात लिप बाम घालू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner