Beauty Tips: तरुण दिसण्यासाठी प्या भरपूर पाणी, पण किती आणि कसे प्यायचे माहितेय का?-beauty tips drink lots of water to look younger but do you know how much and how to drink ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips: तरुण दिसण्यासाठी प्या भरपूर पाणी, पण किती आणि कसे प्यायचे माहितेय का?

Beauty Tips: तरुण दिसण्यासाठी प्या भरपूर पाणी, पण किती आणि कसे प्यायचे माहितेय का?

Sep 27, 2024 11:21 AM IST

Benefits of drinking water: निरोगी दिसण्यासाठी प्रौढ व्यक्तीने २४ तासांत किती पाणी प्यावे? पाण्याचे सेवन न केल्यास त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते.

Benefits of drinking water for face
Benefits of drinking water for face (pexel)

Benefits of drinking water for face: पाण्याला जीवन असे म्हटले जाते. कारण त्याशिवाय आपण जास्त काळ जगू शकत नाही. मानवी शरीराच्या बहुतांश भागात पाणी असते. पाण्याचे सेवन केल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, निरोगी दिसण्यासाठी प्रौढ व्यक्तीने २४ तासांत किती पाणी प्यावे? पाण्याचे सेवन न केल्यास त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. सेलिब्रेटींपासून अनेक इन्फ्ल्यूएंसरसुद्धा सतत पाणी पिताना दिसून येतात. विशेष म्हणजे हे लोक सतत आपल्या बॉटल्स जवळ ठेवतात. सतत पाणी पिल्यानेच त्यांची त्वचा इतकी चमकदार आणि नितळ दिसते.

त्वचेसाठी पाणी खूप महत्वाचे आहे-

त्वचेच्या सौंदर्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो.ज्यामध्ये फेस मास्क आणि महागड्या उत्पादनांचा समावेश असतो. परंतु शरीराला हायड्रेट ठेवल्याशिवाय चेहऱ्यावर अपेक्षित चमक येत नाही याकडे आपण दुर्लक्ष करतो. महागड्या क्रीम्स वापरूनसुद्धा तशी चमक मिळत नाही जशी पाणी पिल्याने तुम्हाला मिळते.

पाण्याचे त्वचेला होणारे फायदे-

१) जेव्हा तुमचे वजन वेगाने कमी होते तेव्हा तुमची त्वचा सैल होते. यापासून बचाव करण्यासाठी लोक पाण्यापासून दूर राहतात. पण हा एक चुकीचा मार्ग आहे. त्यापेक्षा पुरेसे पाणी प्यावे. यामुळे त्वचा हळूहळू घट्ट होईल आणि तिला एक नैसर्गिक चमक मिळेल.

२)त्वचेवर योग्य पीएच पातळी असणे खूप महत्वाचे आहे. उच्च पीएचमुळे त्वचा कोरडी होऊ लागते. त्वचेचा पीएच राखण्यासाठीही पाणी पिणे फायदेशीर ठरते.

३)वाढत्या वयाबरोबर त्वचा ओलावा टिकवून ठेवण्यात कमकुवत होते. पण, पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते.

४) पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहते. पाणी सुरकुत्या आणि छिद्रे दूर करते आणि त्वचेची लवचिकता देखील राखते.

५) शरीरातील असलेल्या विषारी पदार्थांमुळे मुरुम, ऍलर्जी आणि तेलकट त्वचा होऊ शकते. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी पिणे महत्वाचे आहे.

एका दिवसात किती ग्लास पाणी प्यावे?

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या तरुण आणि प्रौढ व्यक्तीने चांगली पचनक्रिया, वजन, उंची आणि त्वचेच्या आरोग्यासाठी दररोज ६ ते ८ ग्लास पाणी प्यावे. यामुळे त्वचेचा घट्टपणा, चमक आणि आरोग्य टिकून राहते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner