What happens when applying lipstick daily: महिलांना मनाच्या अंतर्गत सौंदर्यासोबतच बाह्य सौंदर्य जपायलासुद्धा आवडते. प्रत्येक महिला आपल्या शारीरिक स्वच्छतेकडे आणि सौंदर्याकडे बारकाईने लक्ष देत असते. त्यामुळेच आपले सौंदर्य राखण्यासाठी महिला विविध प्रकारचे प्रॉडक्टस वापरत असतात. त्यातीलच एक ब्युटी प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टिक होय. प्रत्येक महिला आपले ओठ सुंदर आणि आकर्षक ठेवण्यासाठी लिपस्टिक वापरते. पण आजचा काळ इतका बदलला आहे की, अगदी लहान मुलीही ओठांवर लिपस्टिक लावू लागल्या आहेत.
अनेक कंपन्या त्यांच्या लिपस्टिकची विक्री करताना असा दावा करतात की ते तुमच्या ओठांची काळजी घेऊ शकतात आणि त्यांना दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकतात. पण, खरंच असं आहे का? आजची ही माहिती अशा महिलांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे ज्यांना असे वाटते की, लिपस्टिक वापरल्याने त्यांच्या ओठांवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला रोज लिपस्टिक लावल्याने ओठांना होणाऱ्या नुकसानांविषयी माहिती देणार आहोत. चला तर मग त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अनेकवेळा तुम्ही ओठांवर लिपस्टिक लावता तेव्हा ते तोंडातून तुमच्या शरीरातही जाते. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळेच लिपस्टिक लावताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जर तुम्ही नेहमी तुमच्या ओठांवर लिपस्टिक लावत असाल तर त्याचा तुमच्या ओठांच्या नैसर्गिक रंगावर नकारात्मक परिणाम होतो. काही वेळा तुमच्या ओठांचा नैसर्गिक रंगही फिका पडतो. शिवाय तुमचे ओठ काळे पडण्याची भीती असते.
जेव्हा तुम्ही नियमितपणे लिपस्टिक वापरता तेव्हा तुमच्या ओठांची आर्द्रता कमी होते. तुमचे ओठ कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. कधीकधी तुमचे ओठ फाटतात आणि तुम्हाला जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या टाळायची असेल तर तुम्ही नेहमी लिपस्टिक लावणे टाळावे.
लिपस्टिकच्या सततच्या वापरामुळे काहीवेळा तुमचे ओठ तर कोरडे होतातच पण काही वेळा ॲलर्जीचा धोकाही असतो. जर तुमच्यासाठी ओठांना नेहमी लिपस्टिक लावणे महत्त्वाचे असेल, तर चांगल्या दर्जाची लिपस्टिक वापरण्याचा प्रयत्न करा. इतकंच नव्हे तर रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिक काढायला विसरू नका.
(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)