Beauty Mistakes: चेहऱ्यावर चुकूनही एकसोबत लावू नका या ३ गोष्टी, स्किन केअर संबंधित आहेत मोठ्या चुका
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Mistakes: चेहऱ्यावर चुकूनही एकसोबत लावू नका या ३ गोष्टी, स्किन केअर संबंधित आहेत मोठ्या चुका

Beauty Mistakes: चेहऱ्यावर चुकूनही एकसोबत लावू नका या ३ गोष्टी, स्किन केअर संबंधित आहेत मोठ्या चुका

Published Aug 02, 2024 03:35 PM IST

Skin Care Tips: स्किन केअर प्रॉडक्ट्सशी संबंधित अशा कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या एकत्र लावल्यास तुमच्या चेहऱ्याची चमक दूर होऊ शकते, हे जाणून घ्या.

 स्किन केअर संबंधित ब्युटी मिस्टेक
स्किन केअर संबंधित ब्युटी मिस्टेक (unsplash)

Beauty Mistakes in Marathi: जेव्हा सेल्फ केअरचा प्रश्न येतो, तेव्हा त्याची सुरुवात स्किन केअरपासून होते. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती फ्लॉलेस, गोरी आणि चमकदार त्वचेच मिळवण्याचे स्वप्न पाहत असते. ज्यासाठी अनेकदा बाजारातून भरपूर ब्युटी प्रॉडक्ट्सही खरेदी केल्या जातात. पण स्किन केअरच्या बाबतीत ब्युटी प्रॉडक्ट्स अन्नासारखं काम करतात हे फार कमी लोकांना माहित आहे आणि समजतं.

सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सच्या संशोधनानुसार प्रतिकूल गुण आणि मूड असलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर दोन वेगवेगळ्या चांगल्या प्रतीच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर केल्यास त्वचा नेहमीच सुंदर होत नाही. तर असे केल्याने अनेक वेळा त्वचेवर पुरळ, जळजळ, खाज सुटणे, पुरळ किंवा पॅचेस या समस्येवर प्रतिक्रिया उमटते. अशावेळी चला जाणून घेऊया स्किन केअर प्रॉडक्ट्सशी संबंधित अशा कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या एकत्र लावल्यास तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य हिरावून घेऊ शकतात.

व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी

त्वचेचे सौंदर्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी दोन्ही आवश्यक मानले जातात. या दोन्ही जीवनसत्त्वांमध्ये त्वचा लाइटर आणि ब्राइटर करण्याची क्षमता असते. पण जर तुम्ही या दोन व्हिटॅमिन ए आणि सी चा एकत्र त्वचेवर वापर केला तर तुम्हाला फायद्याऐवजी त्वचेची एलर्जी होऊ शकते. हे टाळण्यासाठी दिवसा चेहऱ्यावर व्हिटॅमिन-सी आणि रात्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये व्हिटॅमिन-ए या गोष्टींचा समावेश करा.

व्हिटॅमिन-सी आणि अल्फा-हायड्रॉक्सी अॅसिड

व्हिटॅमिन-सी आणि अल्फा-हायड्रॉक्सी अॅसिड एकत्र चेहऱ्यावर लावणे टाळावे. चेहऱ्यावर दोन्ही गोष्टी एकत्र वापरल्याने त्वचेवर जळजळ, खाज सुटणे, पुरळ येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही गोष्टींमुळे व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी एकत्र त्वचेवर लावल्यास निर्माण होणारी परिस्थिती निर्माण होते.

रेटिनॉल आणि बीएचए

रेटिनॉल हा एक शक्तिशाली अँटी-एजिंग घटक आहे जो त्वचेला एक्सफोलिएट करून त्वचेचा पोत सुधारतो. तर बीएचए एक रासायनिक एक्सफोलिएंट आहे, जो त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावरून मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचे कार्य करतो. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते. या दोन गोष्टी एकमेकांत मिक्स करून लावल्याने त्वचेवर केमिकल बर्न, हायपरपिग्मेंटेशन, लालसरपणा आणि एक्ने होऊ शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner