Ways to Remove Waterproof Mascara: पावसाळ्यात महिलांना वॉटरप्रूफ मेकअप करायला आवडतो. कारण तो चेहऱ्यावर बराच वेळ राहतो आणि सहजासहजी निघत नाही. या प्रकारचा मेकअप पावसामुळे किंवा घामाने खराब होत नाही. अशावेळी बहुतेक लोक डोळ्यांसाठी वॉटरप्रूफ आयलाइनर आणि मस्कारा निवडतात. पण जर असा मेकअप चुकीच्या पद्धतीने काढला तर डोळे आणि पापण्यांचे नुकसान होऊ शकते. डोळ्यांचा मेकअप नीट काढला नाही पापण्याचे केस पडण्यास किंवा तुटण्यास सुरुवात होते. अशावेळी मेकअप नीट काढणं गरजेचं आहे. येथे आम्ही वॉटरप्रूफ मस्कारा कसा काढावा हे सांगत आहोत. या सोप्या पद्धती फॉलो करून तुम्ही वॉटरप्रूफ मस्कारा काढू शकता.
वॉटरप्रूफ मस्कारा खूप चिकट असते. अशावेळी नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईल हा मस्कारा दूर करण्याचा उत्तम मार्ग आहे. याचा वापर करण्यासाठी व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल किंवा व्हर्जिन नारळ तेल, बदाम तेल कॉटन पॅडवर घ्या. हे डोळ्यांना लावा आणि काही सेकंदानंतर पॅड काढून टाका. सर्व मस्कारा निघेपर्यंत ते नीट चोळा. त्यानंतर ओल्या कपड्याने डोळे स्वच्छ करा.
वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी तुम्ही बेबी शॅम्पूचा वापर करू शकता. हा एक सुरक्षित पर्याय आहे. कारण तो हायपोएलर्जेनिक आणि सुगंध-मुक्त आहे. यासाठी थोड्या प्रमाणात बेबी शॅम्पू घ्या. नंतर ते पापण्यांवर लावा. आता ओल्या कॉटन बॉलने डोळे स्वच्छ करा.
वॉटरप्रूफ मस्कारा दूर करण्यासाठी फेशियल मॉइश्चरायझर किंवा कोल्ड क्रीमचा वापर करा. गरम पाण्याने मेकअप काढण्याऐवजी ते काढण्यासाठी क्रीम किंवा लोशन वापरा. क्लिंजरने त्वचा स्वच्छ केल्यानंतर कोल्ड क्रीम लावा. नंतर कोमट मऊ टॉवेलने हळूवारपणे लोशन काढून टाका.
डोळे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आय मेकअप रिमूव्हरचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही आय मेकअप रिमूव्हर कॉटन पॅडवर घ्या. डोळे बंद करून कॉटन पॅड काही सेकंद दाबून ठेवा. त्यानंतर पापण्यांच्या केस स्वच्छ करा. डोळे पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत असे करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या