Home Remedies To Cure Chapped Lips: उन्हाळ्यात ओठ खूप फुटतात. ओठ फाटणे, कोरडे पडणे किंवा ओठांमधून रक्त येणे यासारख्या समस्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतात. शरीरात पाण्याची कमतरता भासताच ओठ फाटू लागतात. अशावेळी काहीही खाणे सुद्धा खूप अवघड वाटते. अशावेळी काही टिप्स तुम्हाला या समस्येला सामोरे जाण्यास मदत करू शकतात. या टिप्सची खास गोष्ट म्हणजे ते आपल्या फाटलेल्या ओठांना रात्रभर पोषण देऊ शकतात आणि ओलावा आतून लॉक करू शकतात. फाटलेले ओठांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतात ते जाणून घ्या.
फाटलेले ओठ दुरुस्त करण्यासाठी आपण दुधाची साय देखील वापरू शकता. ताजे मिल्क क्रीम घ्या आणि ओठांवर लावायला सुरुवात करा. साय आपल्या ओठांना आतून मॉइश्चराइझ करते आणि फाटलेले ओठ बरे करण्यास उपयुक्त आहे. जर तुम्ही लो फॅट मिल्कची साय लावत असाल तर तुम्ही त्यात बदामाचे तेल घालू शकता.
फाटलेले ओठ बरे करण्यासाठी तूप आणि कच्ची हळद पुरेशी आहे. ते बनवण्यासाठी सर्वप्रथम कच्च्या हळदीचा तुकडा तुपात भिजवण्यासाठी ठेवावा. कमीत कमी एक दिवस तरी त्यात राहू द्या. मग तूपातून हळदीचा तुकडा काढून हे तूप एका छोट्या डब्यात साठवून ठेवा. हे तूप रोज ओठांवर लावा. हे तूप बनवून तुम्ही सुमारे १५ दिवस साठवून ठेवू शकता.
ही रेमेडी अवलंबण्यासाठी सर्वप्रथम एलोवेरा जेल, बदाम तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. मग तिन्ही गोष्टी नीट मिक्स करा. एका छोट्या काचेच्या बाटलीत किंवा कंटेनरमध्ये मिक्स करून ठेवा. हे मिश्रण ओठांवर लावा. नियमित पणे लावल्यास नक्कीच फायदा होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या